शरीरात जास्त प्रमाणात असेलेलं कोलेस्ट्रॉल अनेक घटकांवर अवलंबून असतं. बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, वाढतं वय आणि आरोग्याच्या इतर समस्यांमुळे शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. ज्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात कोलेस्ट्रोल असतं, त्यांना हृदयरोग होऊ शकतो. कोलेस्ट्रॉलच्या समस्येवर मात केली नाही आणि दिवसेंदिवस कोस्ट्रेलचं प्रमाण वाढतच गेलं, तर तुम्हाला हृदय विकाराचा झटकाही येऊ शकतो.  आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या अनियमित सवयींमुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. निरोगी राहण्यासाठी शरीरातील चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढली पाहिजे आणि वाईट कोलेस्टेरॉलची पातळी कमी झाली पाहिजे. जर तुमच्या शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढली असेल तर तुम्ही ते कमी करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेले काही खास मसाले तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करू शकतात.

हळद आणि काळी मिरी

आपल्या स्वयंपाकघरामध्ये अनेक मसाले असतात. रोजच्या आहारामध्ये त्यांचा समावेश असतो. त्या मसाल्याच्या मदतीने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करता येते. या मसाल्यांमधील एक म्हणजे हळद होय. हळदीमध्ये भरपूर अँटी-ऑक्सिडेंट्स आणि कर्क्यूमिन नावाचे घटक आढळतात. हे कर्क्यूमिन शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते आणि त्यामुळे शरीर निरोगी होते.

तसेच काळी मिरी देखील खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी देखील प्रभावी आहे. काळ्या मिरीमध्ये आढळणारे टिऑक्सिडेंट, ज्याला पाइपरिन म्हणतात. हे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल पाण्याप्रमाणे काढून टाकते. जर का तुम्ही नियमितपणे काळ्या मिरीचे सेवन केले तर तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये खराब फॅट्स साचून राहणार नाहीत.

दालचिनी आणि मेथीचे दाणे

दालचिनीमध्ये अनेक अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. सकाळच्या वेळेस दालचिनीचे पाणी प्यायल्याने शरीरात जमा झालेले खराब फॅट्स आणि खराब कोलेस्ट्रॉल शरीरातून निघून जाते. तसेच यासह मेथीचे दाणे देखील खराब कोलेस्ट्रॉल दूर करण्यासाठी खूप प्रभावशाली मानले जातात.

मेथीत असणाऱ्या काही घटकांमुळे खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करतात. जर का आपण ओवा कच्चा चावून त्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रि केले जाऊ शकते. यामध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडंट्स खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि याच्या सेवनाने पचनसंस्था देखील मजबूत होते.कोथिंबीर देखील शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल दूर करण्यासाठी मदतशीर ठरते. कोथिंबीर रात्रभर पाण्यात भिजत ठेवून सकाळी ती गाळून त्याचे पाणी प्यावे. त्यामुळे नसांमध्ये साचलेले घाणेरडे कोलेस्टेरॉल शरीरातून बाहेर पडते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)