उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. वातावरणात होणाऱ्या बदलाचा तुमच्या त्वचा आणि केसांवर परिणाम होत असतो. अति थंडीत जसे तुमचे ओठ फुटतात तसे अति उष्णतेमुळेही ओठ फुटतात अथवा कोरडे पडतात. त्यामुळे अशा काळात फुटलेल्या ओठांवर लिपस्टिक कशी लावावी हा प्रश्न तुम्हाला कोणत्याही सीझनमध्ये सतावू शकतो. ओठांना लिपस्टिक लावल्यानंतर लुकमध्ये एक वेगळाच चार्म येतो. इतर मेकअप करत बसण्यापेक्षा अनेक महिला केवळ लिपस्टिक लावण्याला पसंती देतात. त्यातही ग्लॉसी, शिमरी अथवा अन्य लिपस्टिकपेक्षा मॅट लिपस्टिकला अधिक मागणी असते. ही लिपस्टिक ओठांवर अधिक काळ टिकते. पण मॅट लिपस्टिक काढताना मात्र महिलांना काही ब्रँड्सच्या बाबतीत खूपच त्रास होतो आणि ओठ काळे पडण्याचीही भीती असते. मग अशावेळी नक्की काय करावे आणि कसा त्रास होणार नाही याच्या काही सोप्या टिप्स.

नारळाचे तेल

नारळाच्या तेलाप्रमाणेच तुम्ही ऑलिव्ह ऑईलचाही उपयोग करून घेऊ शकता. नैसर्गिक तेल असल्याने तुमचे ओठ काळे पडणार नाहीत आणि मॅट लिपस्टिक लवकर निघण्यास याची मदत मिळेल.लिपस्टिक घालविण्यासाठी ओठ रगडणे योग्य नाही. ओठांना यामुळे नुकसान पोहचू शकते. त्यामुळे वर दिलेले उपाय अधिक सोपे आहेत ते वापरावेत.

मॅट लिपस्टिकपूर्वी लावा लिप बाम​

तुमची मॅट लिपस्टिक अधिक काळ टिकणारी असेल आणि लवकर निघत नसेल तर अशी शेड लावण्यापूर्वी तुम्ही ओठांना लिप बाम लावणे गरजेचे आहे. असे केल्याने ओठ मुलायम राहतील आणि लिपस्टिक काढतानाही त्रास होणार नाही. तसंच रात्री झोपण्यापूर्वी मेकअप काढणे अधिक गरजेचे असते. यासाठी तुम्हाला ओठ रगडावे लागणार नाहीत.

ऑइल क्लींजर वापरा

मॅट लिपस्टिक काढण्यासाठी तुम्ही ऑइल क्लींजर वापरू शकता. यासाठी ऑइल क्लीन्झरमध्ये कापूस बुडवून ओठांवर हळू हळू पुढे मागे करत पुसा आणि नंतर पाण्यानं धूवून काढा. याने लिपस्टिक सहज स्वच्छ होईल आणि ओठांचा ओलावा कायम राहील.

हेही वाचा – Health special: मधुमेहींमध्ये उन्हाळ्यात रक्तातील साखर घटण्याचे कारण काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मायसेलर क्लींजिंग वॉटर

​​तुम्ही लिपस्टिक काढण्यासाठी मायसेलर क्लींजिंग वॉटर वापरू शकता. यासाठी कापूस बुडवून किंवा मायसेलर पाण्यात पुसून ओठा हळूच पुसून काढा. यामुळे लिपस्टिक सहज निघून जाईल आणि ओठ मऊ होतील.