Fitness: आजकाल लोकांची बैठी जीवनशैली झाली आहे म्हणजेच लोकांना तासनतास बसून काम करावे लागते आणि ऑफिसमधून घरी परत आल्यानंतरही स्वत:साठी वेळ काढणे अवघड असते. तंदुरुस्त राहण्यासाठी आणि व्यायाम करण्यासाठ वेळ आणि क्षमता आवश्यक असते जी आपल्याकडे नसते. अशा स्थितीमध्ये आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमचे वजन नियंत्रणात ठेवू शकता. या टिप्स अंमलात आणण्यासाठी तुम्हाला फार कष्ट करावे लागणार नाही पण, काही सवयी मात्र बदलाव्या लागतील.
तंदुरुस्त राहण्यासाठी सोप्या टिप्स
डिटॉक्स ड्रिंक्स घ्या
बाहेरचे खाद्यपदार्थामुळे आणि आरोग्याची काळजी न घेतल्यामुळे शरीरामध्ये नको असलेले विषारी घटक साचतात. या विषारी घटकांना शरीराच्या बाहेर काढण्यासाठी डिटॉक्स ड्रिंकचे सेवन करू शकता. नारळपाणी, जीरा पाणी, ओव्याचे पाणी आणि धन्याचे पाणी असे डिटॉक्स ड्रिंक्स घेऊ शकता.
झोप पूर्ण करा
झोप पूर्ण केल्याने शरीर निरोगी राहते. शरीराला पूर्ण आराम मिळतो तेव्हा व्यक्ती शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्या देखील तंदुरुस्त राहतो. त्यामुळे रोज ६ ते ८ तासांची झोप आवश्यक आहे.
हेही वाचा – जर तुम्हाला आदर्श वडील व्हायचे असेल तर तुमच्या मुलांना ‘या’ गोष्टी आवर्जून शिकवा
चालत राहा
जेव्हा तुम्ही चालता तेव्हा शरीराची काही प्रमाणात झीज होते म्हणजेच चरबी कमी होण्यास मदत होते आणि शरीर तंदुरुस्त राहते. तंदुरुस्त राहण्यासाठी दिवसातून कमीत कमी अर्धा तास चालावे.
उपाशी राहू नका
लोकांना नेहमी असे वाटते की जास्त खाल्ले तर वजन वाढते म्हणून लोक उपाशी राहातात पण त्याचा परिणाम मात्र उलटा होतो. जेवण न करणे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यापेक्षा वेळच्या वेळी जेवण करा. फक्त हे लक्षात ठेवा की एका वेळी गरजेपेक्षा जास्त खाऊ नका.
हेही वाचा – स्क्वॅट्समुळे तुमचे पाय कसे होतील मजबूत? कसे करावे स्क्वॅट्स? आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
भरपूर पाणी प्या
शरीराला पाण्याची आवश्यता असते त्यामुळे पुरश्या प्रमाणात पाणी प्या. दिवसभरामध्ये पाण्याशिवाय तुम्ही ताजी फळे आणि भाज्यांचा रस, लिंबू पाणी प्या आणि नारळाचे पाणी देखील पिऊ शकता. शरीर स्वस्थ राहू शकते.