What Should I Drink In The Morning For Acidity : सकाळी नाश्ता करा किंवा नका करू, काही जणांना अ‍ॅसिडिटी, मळमळणे अगदी अपचनाचा (अ‍ॅसिडिटी) त्रास हा होतोच. मग अशावेळी आपण नाश्ता करावा की नाही, नक्की कोणत्या वेळेला करावा, कोणत्या गोष्टी नाश्त्यात खाव्यात आणि कोणत्या नाही, असे अनेक प्रश्न आपल्या समोर उभे राहतात. तर सकाळी उठल्यावर अनेकदा अपचन आणि अ‍ॅसिडिटी विविध कारणांमुळे होऊ शकते. जसे की आदल्या दिवशी रात्री जास्त जेवण, रात्री उशिरा जेवणे, त्यामुळे याचा परिणाम संपूर्ण दिवसावर होतो.

तर सकाळी अ‍ॅसिडिटी आणि गॅसपासून आराम मिळविण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता… यातील काही उपाय तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात सापडतील, यामुळे पचनाच्या समस्यांपासून आराम मिळेल…

अ‍ॅसिडिटी आणि गॅससाठी काही घरगुती उपाय पुढीलप्रमाणे… (Acidity And Gas Home Remedies )

गरम पाणी आणि लिंबू (Warm Water with Lemon)

तुमच्या दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाण्याने करा. या कोमट पाण्यात काही थेंब लिंबाच्या रसाचे घालायला विसरू नका. यामुळे पचनक्रिया गतिमान होऊन पोटातील आम्ल संतुलित राहण्यास मदत होते. लिंबू जरी आम्लयुक्त असले तरी शरीरात चयापचय झाल्यानंतर ते अल्कधर्मी बनते, ज्यामुळे आम्लता कमी होण्यास मदत होते.

बडीशेप (Fennel Seeds)

बडीशेपच्या बियांमध्ये असे गुणधर्म असतात जे पोटाच्या आतील थरांना आराम देण्यास आणि गॅस व पोटफुगी कमी करण्यास मदत करतात. जेवणानंतर किंवा सकाळी सर्वात आधी एक चमचा बडीशेप चघळल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोटातील आम्लता कमी होते.

आल्याचा चहा (Ginger Tea)

आल्यामध्ये दाहक-विरोधी आणि पचनक्रिया सुधारण्याचे गुणधर्म आहेत, त्यामुळे रिकाम्या पोटी आल्याचा चहा प्यायल्याने आतड्यांतील स्नायूंना आराम मिळतो, गॅस कमी होतो, अ‍ॅसिड रिफ्लक्सची लक्षणेसुद्धा कमी होतात.

कोरफडीचा रस (Aloe Vera Juice)

नाश्त्यापूर्वी थोड्या प्रमाणात (सुमारे १ ते २ चमचे) कोरफडीचा रस पोटाच्या आवरणाला आणखीन एक आवरण देतो आणि आम्लामुळे होणारी जळजळ कमी करण्यास मदत होते. कोरफडीमध्ये शांत करणारे गुणधर्म असतात आणि ते पोटात पीएच संतुलन राखण्यासदेखील मदत करतात.

केळी किंवा पपई (Banana or Papaya)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केळ्यामध्ये अल्कधर्मी गुणधर्म असतात आणि यामुळे पोटातील आम्ल निष्क्रिय करण्यास मदत करतात. त्यात फायबरदेखील भरपूर असते, जे पचन सुधारण्यास मदत करतात. दुसरीकडे पपईमध्ये पपेन असते, जे एक पाचक एंजाइम असते; जे पोटफुगी आणि आम्लता कमी करण्यास मदत करतात.