scorecardresearch

कापलेली फळं ‘या’ पद्धतीने साठवल्यास खुप दिवसांपर्यंत राहतील ताजी; जाणून घ्या साठवण्याची योग्य पद्धत

कापलेली फळं ताजी राहावीत यासाठी कोणते उपाय फायदेशीर ठरतात जाणून घ्या

कापलेली फळं ‘या’ पद्धतीने साठवल्यास खुप दिवसांपर्यंत राहतील ताजी; जाणून घ्या साठवण्याची योग्य पद्धत
कापलेली फळं साठवण्याचे उपाय (Photo: Freepik)

फळांमध्ये अनेक पोषकतत्त्व आढळतात. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी फळं आपल्याला मदत करतात. ऋतूनुसार उपलब्ध असणारी फळं प्रत्येकाने खावी, असा सल्ला तज्ञांकडून दिला जातो. हिवाळ्यात इतरवेळी उपलब्ध नसणारी फळं उपलब्ध होतात, त्यामुळे या काळात खुप फळं विकत घेतली जातात. अनेकवेळा आपण फळं कापून ठेवतो जेणेकरून दुसऱ्या दिवशी कामाच्या गडबडीत ती कापलेली फळं खाता येतील. पण कापलेली फळं नीट ठेवली नाहीत तर लगेच खराब होऊ शकतात. यासाठी काही उपाय फायदेशीर ठरतात. कोणते आहेत ते उपाय जाणून घ्या.

कापलेली फळं खुप दिवसांपर्यंत ताजी राहावीत यासाठी वापरा या पद्धती

आणखी वाचा: सफरचंद, बटाटे कापल्यानंतर काळे का पडतात? जाणून घ्या यामागचं वैज्ञानिक कारण

  • जर तुम्हाला फळं ६ ते ८ तासांसाठी ताजी राहावीत असे वाटत असेल तर तुम्ही फळांमध्ये थोडे लिंबू पिळून फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे फळं खराब होणार नाहीत आणि त्यांची चवही तशीच राहील.
  • ‘फ्रुट चाट’ बनवण्यासाठी बहुतांश वेळा फळं आधीच कापून ठेवली जातात. पण कधीकधी ही फळं खराब होतात. अशावेळी कापलेली फळं ताजी ठेवण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा. एका भांड्यात थंड पाणी घेऊन त्यात कापलेली फळं ठेवा. यामुळे ही फळं ताजी राहतील आणि काळीही पडणार नाहीत.
  • सफरचंद कापल्यानंतर लगेच काळे पडते. हे टाळण्यासाठी त्यावर थोडे लिंबू पिळा. यामुळे सफरचंद काळे पडणार नाही.
  • जर तुम्ही प्रवासात कापलेली फळं घेऊन जाणार असाल, तर त्यावर थोडी सीट्रिक ऍसिड पावडर टाका, यामुळे फळं ताजी राहण्यास मदत मिळेल.
  • प्लास्टिक बॅग किंवा ॲल्युमिनियम फॉईलमध्ये कापलेली फळं ठेवल्यास ती ताजी राहण्यास मदत मिळते.
  • स्ट्राबेरी मोठ्या टिशूमध्ये ठेवल्यास त्यातील ओलावा शोषून घेतला जातो, त्यामुळे स्ट्राबेरी ताजी राहण्यास मदत मिळते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-12-2022 at 18:34 IST

संबंधित बातम्या