आजकाल वजन कमी करण्यासाठी लोक धावणे, जिम वर्कआऊट किंवा डाएट प्लॅनवर भर देतात. पण आपल्या रोजच्या चालण्यात थोडासा बदल केला तरी तो वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय ठरू शकतो हे अनेकांना माही नसते. चालणे हा सगळ्यात सोपा आणि नैसर्गिक व्यायाम आहे; पण आपण त्यात हातांची योग्य हालचाल समाविष्ट केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दुप्पट होऊ शकतात. आपण चालतो तेव्हा फक्त पाय काम करतात, असे आपल्याला वाटते; पण खरं तर हातांची हालचाल, शरीरातील ऊर्जावापर, स्नायूंची एकजूट व चालण्याचा वेग या बाबींचा वजन घटवण्यात थेट महत्त्वपूर्ण कार्यभाग असतो. चला तर मग जाणून घेऊया चालताना हातांचा योग्य वापर कसा करावा आणि त्या हालचालींची वजन कमी करण्यात कशी मदत होते.
चालताना हातांची योग्य हालचाल वजन कमी करण्यात कशी मदत होते?
१. हातांच्या उद्देशपूर्ण हालचाली
केवळ संतुलनासाठीच नाही, तर खांद्यावरून हात हलवूनही तुम्ही तुमच्या शरीराला गती देऊ शकता. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, चालताना हातांच्या सक्रियतेने हालचाली केल्यामुळे १० ते १५ टक्के जास्त कॅलरीज बर्न होतात.
२. कोपर ९० अंशांपर्यंत वाकवल्याने – हालचाल आणि शरीरयष्टीची श्रेणी सुधारते.
चालताना जेव्हा तुम्ही तुमच्या हाताचे कोपरे सुमारे ९० अंशांमध्ये वाकवले पाहिजे आणइ मग पुढे-मागे हालचाल केली पाहिजे. अशा पद्धतीने हातांची हालचाली अधिक प्रभावी ठरतात.
३. शरीराच्या मध्यरेषेच्या पलीकडे हात पोहोचवणे – गाभ्याच्या स्नायूंना बळकटी देणे
चालताना जेव्हा हात शरीराच्या मध्यरेषेच्या पुढे थोडेसे तिरक्या स्वरुपात असतात, तेव्हा पोटाचे स्नायू आपोआप सक्रिय होतात. हलकेच वाकून केली जाणारी ही हालचाल हातांचे स्नायू (obliques) मजबूत करते आणि कंबरेचा आकार हळूहळू सुधारतो आणि घट्ट होतो. हे एक साधे चालणेही कोअर (core) मजबूत करणारा व्यायामामध्ये रुपांतरिक होऊ शकतो, ही पद्धत खेळाडू नियमित वापरतात
४. कोर सक्रियतेसाठी मध्यरेषा ओलांडणे
जेव्हा हात शरीराच्या मध्यरेषेसमोर थोडेसे एकमेकांशी जोडले जातात तेव्हा पोटाचे स्नायू नैसर्गिकरीत्या सक्रिय होतात. हे सूक्ष्म वळण तिरकस स्नायूंना बळकटी देते आणि कालांतराने कंबर टोन करण्यास मदत करते. ही एक अशी युक्ती आहे, जी खेळाडू शरीराच्या खालच्या आणि वरच्या हालचालींना जोडण्यासाठी वापरतात त्यामुळे साध्या चालण्याला प्रभावी कोर वर्कआउटमध्ये रूपांतरित केले जाते.
५. दर काही मिनिटांनी हात वर करून चालणे
दर काही मिनिटांनी ३० सेकंद हात वर करून चालल्याने तुमच्या हृदयाची गती वाढेल. हे जिममध्ये लहान कार्डिओ ब्रेकसारखे काम करते आणि तुम्हाला त्याच दिनचर्येचा कंटाळा येणार नाही.
६. श्वासोच्छवास आणि हातांच्या हालचालींत समन्वय – स्थिर गती राखते
चालताना जेव्हा हातांची हालचाल पुढे मागे होते तेव्हा श्वास घेतल्याने श्वासाची लय स्थिर होते आणि वेग स्थिर राहतो. खोल श्वास घेतल्यास फुप्फुसांची क्षमता वाढते आणि जास्त ऑक्सिजन मिळून थकवा कमी होतो. ही कृती तुम्हाला जास्त काळ फॅट बर्न करण्याच्या झोन’मध्ये ठेवते म्हणजे साठवलेल्या चरबीचा उर्जा मिळवण्यासाठी वापर केला जातो.
७. मंद हालचालीने मागे ढकलण्यावर लक्ष केंद्रित करा
चालताना हात फक्त पुढील दिशेला झुकवण्यावर लक्ष न देता, हातांना मागील बाजूला ढकलण्यावरही लक्ष दिल्यास फरक पडतो. हात मजबुतीने मागे ढकलल्यास ट्रायसेप्स आणि वरच्या पाठीचे स्नायू सक्रिय होतात. यामुळे फक्त जास्त ऊर्जा खर्च होत नाही, तर हातांची मजबुती वाढते आणि स्नायूंचा समतोल राखून चालणे अधिक प्रभावी होॉते