Beetroot ice cubes for skin care: आजकाल ब्युटी ट्रेंड्समध्ये नैसर्गिक घटकांचा वापर खूप वाढला आहे. महागडी क्रीम्स आणि केमिकल प्रॉडक्ट्स वापरण्याऐवजी लोक घरच्या घरी घरगुती उपचारांना जास्त पसंती देऊ लागले आहेत. त्यात बीटरूट हा एक उत्तम पर्याय मानला जातो. बीटरूटमध्ये नैसर्गिक पिग्मेंट्स, अँटिऑक्सिडंट्स व व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात आढळतात, जे शरीरासाठी फायद्याचे तर आहेतच; पण त्वचेलाही निरोगी आणि चमकदार बनवतात. म्हणूनच आज आपण जाणून घेऊया बीटरूट आइस क्यूब्सचे फायदे आणि ते वापरण्याची पद्धत.

  • बीटरूट आइस क्यूब्स कसे बनवायचे?


बीटरूट स्वच्छ धुऊन त्याचे लहान लहान तुकडे करा आणि किसून किंवा ब्लेंड करून स्मूथ पेस्ट तयार करा आणि गरज असल्यास त्यात थोडे पाणी घालावे. तयार पेस्ट आइस क्यूब ट्रेमध्ये भरा आणि ट्रे फ्रीजरमध्ये चार ते पाच तास ठेवून बर्फ होऊ द्या. नंतर आइस क्यूब बाहेर काढा. या नैसर्गिक आइस क्यूबचा वापर नियमितपणे केल्यास त्वचेवर ताजेतवानेपणा, नैसर्गिक चमक आणि डलनेस कमी होण्यास मदत होते. या सोप्या घरगुती उपायामुळे महागड्या स्किनकेअर प्रॉडक्ट्सची गरजही कमी होते.

  • चेहऱ्यावर बीटरूट आइस क्यूब कसा वापरायचा?

बीटरूट आइस क्यूब वापरण्याची पद्धत अगदी सोपी आहे. सर्वप्रथम चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. आता एक बीटरूट आइस क्यूब घ्या आणि तो कापड किंवा कॉटनच्या पातळ कपड्यात गुंडाळा. हा क्यूब चेहऱ्यावर हलक्या हाताने फिरवत मसाज करा. सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी असे केल्याने सर्वोत्तम परिणाम दिसतात.

  • बीटरूट आइस क्यूबचे फायदे

१. ताजेपणा आणि थंडावा-

चेहऱ्यावर बीटरूट आइस क्यूब फिरवल्यास त्वचेला तत्काळ थंडावा आणि ताजेतवानेपणा मिळतो. उन्हाळ्यात किंवा प्रदूषणामुळे चेहरा थकलेला दिसत असेल, तर हा उपाय खूप उपयोगी पडतो.

२. चमक आणि डलनेस कमी करणे

नियमितपणे बीटरूट आइस क्यूब वापरल्याने त्वचेची रुक्षता कमी होऊन चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. बीटरूटमधील नैसर्गिक रंगद्रव्य त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करते.

३. मुरमे आणि डाग कमी करणे

बीटरूटमध्ये अँटिऑक्सिडंट्स असल्याने ते त्वचेवर येणारी मुरमे आणि त्यांच्या खुणा कमी करण्यास मदत करतात. सतत वापरल्यास त्वचेवरील डाग हळूहळू फिकट होतात.

४. डोळ्यांखालची सूज कमी करणे

थकवा, झोपेची कमतरता किंवा स्ट्रेसमुळे डोळ्यांखाली सूज येते. अशा वेळी बीटरूट आइस क्यूब डोळ्यांभोवती फिरवल्यास सूज आणि काळी वर्तुळे कमी होतात.

५. तेलकटपणावर नियंत्रण

ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांच्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. बीटरूट आइस क्यूब त्वचेतील जास्त तेलकटपणा कमी करून त्वचेला मॅट फिनिश देतात.

बीटरूट आइस क्यूब हा एक अगदी सोपा, घरगुती आणि नैसर्गिक उपाय आहे. त्यामुळे महागडे स्किनकेअर प्रॉडक्ट्स खरेदी करण्याची गरज कमी होते. नियमित वापरल्यास चेहऱ्यावरील चमक, ताजेतवानेपणा आणि निखळ सौंदर्य टिकवता येते. त्यामुळे पुढच्या वेळेस किचनमध्ये बीटरूट असताना, त्याचा फायदा फक्त जेवणातच नाही, तर आपल्या त्वचेसाठीही करून बघा.