घराची साफ सफाई करायचे ठरवले की पंखा स्वच्छ करणे हे जवळपास सर्वांनाच कंटाळवाणे आणि दुप्पट काम करायला लावणारे वाटत असते. उन्हाळा असो वा पावसाळा दिवस-रात्र सतत फिरून हे यंत्र आपल्याला गार हवा देण्याचे काम करत असते. मात्र इतके काम केल्याने त्यावर भरपूर धूळ जमा होते. अशी घाण वेळोवेळी साफ न केल्याने त्याच धुळीचे रूपांतर जाड जळमटांमध्ये होते.

झाडूच्या मदतीने किंवा ओल्या फडक्यांच्या साहाय्याने पंख्याच्या पाती स्वच्छ केल्या जातात. त्यामुळे जळमटं, धूळ जमिनीवरसुद्धा पडतात. म्हणून व्यक्तीला पंखा झाडल्यावर, पुन्हा एकदा फरशीवर पडलेल्या कचरा साफ करण्यासाठी केर काढावा लागतो. अशी कंटाळवाणी आणि अधिक कष्ट असणारी पद्धत तुम्हीही वापरत असाल तर जरा थांबा. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @masteringhacks नावाच्या अकाउंटने एक भन्नाट आणि अत्यंत उपयुक्त अशा क्लीनिंग हॅकचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये, उशीला घातल्या जाणाऱ्या कव्हरचा वापर केलेला आपण पाहू शकतो. या कव्हरचा वापर करून पंखा कसा साफ करायचा ते पाहा.

हेही वाचा : Kitchen tips : भात गिचगिचीत किंवा खूप मोकळा होतोय? ‘ही’ असू शकतात त्याची कारणं; या पाच उपयुक्त टिप्स पाहा…

उशीच्या कव्हरने पंखा साफ करण्याची ट्रिक पाहा :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • सर्वप्रथम उशीचे कव्हर घ्यावे.
  • आता ते कव्हर पंख्याच्या पातीमध्ये उशी भरतो त्याप्रमाणे घालत जावे.
  • पात्यामध्ये अडकवलेल्या त्या कव्हरच्या दोन्ही बाजूंनी पंख्याची पात स्वच्छ पुसून घ्यावी.
  • असे केल्याने सगळी धूळ आणि जळमट त्या उशीच्या कव्हरमध्ये जमा होईल आणि तुमची फारशी देखील स्वच्छ राहील.

अशा पद्धतीने पंख्याची स्वच्छता करण्याची भन्नाट हॅक सोशल मीडियावर @masteringhacks या अकाउंटने शेअर केली असून, आत्तापर्यंत याला ११०K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.