शॅम्पू योग्यप्रकारे कसा वापरायचा? जाणून घ्या ‘या’ पाच उपयुक्त टिप्स

केसांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे आणि योग्य प्रकारे शॅम्पू करणे हे सर्वात महत्वाचे आहे.

hair care
केसांची काळजी (फोटो:Pexeles)

केसांची काळजी घेण्यासाठी योग्यप्रकारे काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. कधी कधी केसांची काळजी घेण्याचा कंटाळा येतो. पण काही गोष्टी ण चुकता केल्यास केस छान राहण्यास मदत होते. बहुतेक लोक आठवड्यातून एकदा तरी आपले केस धुतात, परंतु अनेकांना शॅम्पू नक्की कसा वापरायचा याचा योग्य मार्ग माहित नाही. स्किनझेस्टचे संस्थापक आणि सल्लागार त्वचारोग तज्ञ डॉ. नुपूर जैन सांगतात, “केसांची काळजी घेण्याच्या दिनक्रमात शॅम्पूइंग ही सर्वात महत्वाची पायरी आहे, म्हणून काही तथ्ये जाणून घेणे आणि शॅम्पूइंग योग्य कसे करावे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.”

केसांच्या प्रभावी काळजीसाठी या आहेत पाच शॅम्पूइंग टिप्स

१. शॅम्पू फक्त टाळू स्वच्छ करण्यासाठी आहे

शॅम्पू फक्त टाळूसाठी आहे, उत्पादनाच्या तीव्रतेनुसार शॅम्पू ३० सेकंद किंवा त्यापेक्षा जास्त काळ एकट्या टाळूमध्ये मालिश केले पाहिजे. लक्षात ठेवा की समान वितरणासाठी आणि चांगले लॅथरिंगसाठी, आपले केस ओले असणे आवश्यक आहे.

२. शॅम्पू कमी प्रमाणात वापरला पाहिजे

आपण कमी प्रमाणात शॅम्पू न वापरल्यास केस जास्त कोरडे होऊ शकते. जास्त शॅम्पू लावल्याने तुमचे केस खराब होऊ शकतात. तुमचे केस कितीही लांब असले तरीही, अगदी थोडासा शॅम्पू लावावा.

३. शॅम्पूचा वापर किती वेळा करावा?

आपल्यापैकी बरेचजण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा शॅम्पू लावतात. परंतु तुमच्या केसांच्या पोत आणि टाळूच्या स्वभावावर हे अवलंबून असते की शॅम्पूचा वापर किती वेळा करावा? काहींना दररोज शॅम्पू करण्याची आवश्यकता असू शकते आणि अशा परिस्थितीत सौम्य शॅम्पू वापरणे आवश्यक आहे. काहींना टाळूला नियमित शॅम्पू करण्याची आवश्यकता नसली तरी, पोत आणि वाढीसाठी वारंवारता कमी करणे महत्वाचे आहे. शॅम्पू करताना तुम्हाला काही समस्या येत असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे तुम्हाला चांगले परिणाम मिळवण्यासाठी मदत करू शकते.

४. कोणताही शॅम्पू उत्तम नाही

जे दुसर्‍याला बरोबर वाटेल तोच शॅम्पू तुमच्यासाठी योग्य आहे असं असू शकत नाही. प्रत्येकाचे केस वेगळे असतात. आपल्या केसांना त्याच्या प्रकृतीनुसार शॅम्पू शोधणे आवश्यक आहे. त्वचारोगतज्ज्ञ तुमच्या टाळूची स्थिती आणि केसांच्या पोत याबाबत मार्गदर्शन करू शकतात. काहींचे कोरडे टाळू आणि काही तेलकट असू शकतात, म्हणून योग्य शॅम्पू निवडणे गरजेचे असते.

५. ओल्या केसांना टॉवेलने बांधू नका

एकदा आपण आपले केस धुतले की नीट सुकवलेही पाहिजे. आपले केस घट्ट टॉवेलने बांधल्याने त्याचं नुकसान होऊ शकते. आपले केस सुकवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे कॉटन टॉवेल किंवा कॉटन टी-शर्ट वापरणे; त्याच्या मऊ पोतामुळे केसांचे कोणतेही नुकसान होणार नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: How to use shampoo properly here are five helpful tips ttg

ताज्या बातम्या