Utensils Without Soap :बर्‍याच वेळा भांडी धुवायला जातो आणी बघतो की साबण संपलेला आहे. कधीकधी घरात जास्तीचा साबण नसेल भांडी साफ कशी करावी असा प्रश्न पडतो. अशा परिस्थितीमध्ये काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा वापर केल्यानंतर तुम्ही साबण वापरणेच विसरून जाल. स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी असतात ज्याचा वापर करून तुम्ही भांडी अगदी नवीन सारखी चमकू शकता. चला जाणून घेऊ या खास ट्रिक्स

साबणाशिवाय भांडी धुण्याच्या ट्रीक्स

बेकिंग सोडा – काही भांडी अशी असतात की ती साबणानेही साफ होत नाहीत. अशा परिस्थितीत बेकिंग सोडा खूप उपयुक्त आहे. भांडी धुण्यापूर्वी, त्यांना गरम पाण्यामध्ये भिजवा, नंतर त्यामध्ये बेकिंग सोडा टाका. थोड्या वेळाने स्पंजच्या मदतीने स्वच्छ करा.

हेही वाचा – पावसामध्ये तुमचा Smartphone सुरक्षित कसा ठेवावा? जाणून घ्या सोप्या Safety Tips

नॅचरल क्लीनर – जर तुमचा साबण संपला असेल तर तुम्ही घरच्या घरी नैसर्गिक भांडी क्लिनर देखील बनवू शकता. हे करण्यासाठी, एक कप गरम पाण्यात २ चमचे मीठ आणि १ लिंबाचा रस मिसळा, नंतर ते चांगले मिसळा. हे मिश्रण भांड्यात नीट लावल्यानंतर घासून घ्या. यामध्ये असलेले मीठ भांड्यातील घाण दूर करेल आणि लिंबू भांड्यांचा वास दूर करण्याचे काम करेल.

राखेने स्वच्छ करा – पूर्वी गावात फक्त राखेनेच भांडी साफ केली जायची. राखेने भांडी साफ केल्यानंतर त्यातून वास येत नाही. भांड्यात लाकडाची राख शिंपडून, तुम्ही स्पंजच्या मदतीने ते स्वच्छ करू शकता.

हेही वाचा – Kitchen Hacks: तुमचा कुकर पिवळा पडला आहे का? मग चुटकीसरशी होईल नवा! ‘असे’ करा साफ

तांदळाचे पाणी – तांदळाचे पाणी साबणाशिवाय भांडी स्वच्छ करण्याचाही चांगला उपाय आहे. त्यात स्टार्च आणि सायट्रिक ऍसिड असल्यामुळे भांड्यातील ग्रीस सहज निघून जातो. ते वापरण्यासाठी, तांदळाच्या पाण्यात भांडी ३० मिनिटे भिजवून ठेवा, नंतर ते चांगले घासून घ्या आणि कोमट पाण्याने चांगले धुवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिनेगर वापरा – कोणत्याही भांडीच्या पूर्ण साफसफाईसाठी व्हिनेगर वापरणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये एक कप पाणी आणि४-५ चमचे व्हिनेगर मिसळा. भांड्यात फवारणी केल्यानंतर, ते असेच सोडा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. याशिवाय त्यात बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिसळून भांडी साफ करता येतात.