घरामध्ये तुळस ते विविध रंगांच्या फुलांची रोपं अनेकजण अगदी हौसेने लावत असतात. अनेकांना बागकामाची तशी आवडदेखील असते. परंतु रोपाची सुंदर आणि भरपूर वाढ होण्यासाठी त्यांना आवश्यक तितके पाणी, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने घालणे गरजेचे असते. तसेच हवामानानुसार पाणी घालण्याच्या वेळांमध्येसुद्धा बदल करणे आवश्यक असते.

इतकेच नाही तर, कुंडीमधील मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी, तिच्यामध्ये हवा खेळती राहण्यासाठी तुम्ही काय-काय करू शकता याबद्दल युट्युबवरील MaziRecipeMaziBaag या चॅनलने खूप सोप्या अशा टिप्स दिल्या आहेत. आपल्या रोपांची काळजी घेण्यासाठी पाण्याचे नियोजन करण्यासाठी, तसेच त्यांची काळजी घेण्यासाठी काय करावे ते पाहा.

हेही वाचा : Garden tips : गणपती बाप्पाला आवडणाऱ्या दुर्वा घरी कशा उगवायच्या? पाहा ही सोपी हॅक

रोपांची काळजी घेण्यासाठी या १० टिप्स पाहा

१. घरातील कुंडीमध्ये अनावश्यक पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्र असणे आवश्यक आहे.
२. कुंडीमध्ये माती भरण्याआधी त्यामध्ये नारळाच्या शेंड्या, विटांचे तुकडे घालावेत. यामुळी अतिरिक्त पाणी शोषले जाईल.
३. कुंडीमध्ये माती साधारण एक इंचभर कोरडी पडल्यानंतर रोपांना पाणी घालावे.
४. कुंडीमधील माती दर काही दिवसांनी उकरून तिला भुसभुशीत, मोकळी करून घ्या. त्यामुळे माती व रोपांना व्यवस्थिती हवा मिळेल. माती उकरून ठेवलेल्या दिवशी रोपाला पाणी घालू नये.
५. थंड हवामानात किंवा हिवाळ्यात रोपांना संध्याकाळी, रात्री पाणी घालू नये. असे केल्यास माती आणि रोपांमध्ये पाणी शोषून घेतले जात नाही. पारिणामी, मातीवर बुरशीजन्य रोग, किडे येऊ लागतात.
तर, उन्हाळ्यामध्ये रोपांना सकाळी नऊ वाजायच्या आधी आणि संध्याकाळी सात वाजल्यानांतर पाणी द्यावे. बदलणाऱ्या हवामानानुसार रोपांना पाणी देण्याच्या वेळांमध्ये बदल करावा.

हेही वाचा : आज अंड्याचा नव्हे, तर त्याच्या ‘कवचांचा’ फंडा पाहू! कचऱ्यात फेकून देण्याआधी या पाच टिप्स पाहा

६. आपल्या घरात असणाऱ्या रोपांना गरजेपक्षा अधिक पाणी देऊ नये. अन्यथा याचा परिणाम रोपांच्या मुळांवर होऊन, रोप मरू शकते.
७. स्वयंपाकघरात डाळ-तांदूळ धुतल्यानंतर ते पाणी रोपांना घालावे. तसेस, चहा पावडर, आले असे पदार्थ वाळवून ते मातीत टाकल्यास, माती भुसभुशीत राहण्यास मदत होते.
८. शक्य असल्यास, दर पंधरा दिवसांनी रोपांमध्ये शेणखत किंवा शेणपाणी घालावे.
९. घराच्या आत ठेवल्या जाणाऱ्या इन-डोअर रोपांनादेखील आठवड्यातून एकदा पाणी घालावे.
१०. झाडांना उत्तम प्रथिनयुक्त खत हवे असल्यास, १ अंडे फोडून त्याचा बल्क बाटलीत भरा. त्यामध्ये लिंबाचा रस आणि २५-३० ग्रॅम गूळ घालून बाटलीचे झाकण घट्ट बंद करून घ्या. आता हे मिश्रण, दररोज बाटलीचे झाकण उघडून हलवत/ढवळत राहावे. एका महिन्यानंतर तयार झालेले मिश्रण साधारण ५ml कुंडीमध्ये ओतून द्यावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युट्युबवरील MaziRecipeMaziBaag चॅनलने शेअर केलेल्या या काही सोप्या टिप्स आहे. हे उपाय आवडल्यास घरी प्रयोग करून पाहा.