Relationship Tips : नवरा बायकोचे, नातं हे एक पवित्र नातं मानलं जाते. या नात्यात एकमेकांविषयी प्रेम, जिव्हाळा, काळजी असते. नवरा बायकोचं नातं म्हटलं रुसवा-फुगवा, छोटी मोठी भांडणं होतात. पुरुषांपेक्षा महिला जास्त भावनिक असतात, असे म्हटले जाते. त्यामुळे अनेकदा महिला त्यांच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करताना दिसते.
अनेकदा पत्नी नाराज असेल किंवा ती रागावली असेल तर पतीला कळत नाही की तिचा राग कसा शांत करावा. जर तुमची बायकोही तुमच्यावर रागावली असेल तर तिचा राग शांत करण्यासाठी तुम्ही या खास टिप्स ट्राय करू शकता.

  • जर बायको नाराज असेल तर नवऱ्याने हा विचार करावा की तिला शांत कसे करावे ज्यामुळे तिची नाराजी दूर होईल.
  • जर पत्नी रागावली असेल तर शब्द जपून वापरा. तुमच्या एखाद्या चुकीच्या शब्दामुळे ती आणखी दुखावू शकते ज्यामुळे राग शांत होणार नाही तर आणखी वाढू शकतो.
  • ज्या दिवशी बायको रागावली त्या दिवशीच रात्रीपर्यंत राग शांत करायचा प्रयत्न करा. ज्यामुळे नव्या दिवसाची तुम्हाला फ्रेश सुरुवात करता येईल.
  • बायको जर रागावली असेल तर तिला खूप छान सरप्राइज द्या. तिचा आवडता पदार्थ बनवा आणि तिला प्रेमाने खाऊ घाला. यामुळे तिचा मूड बदलू शकतो आणि रागही शांत होऊ शकतो.

हेही वाचा : बायकांनो, नवऱ्याचं तुमच्यावर खरंच प्रेम आहे का, हे कसं ओळखायचं? ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
World Art Day Art and Income Source in Marathi
पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल; पण कलेशी केलेली मैत्री…आयुष्य समृद्ध करणाऱ्या कलेमुळे तुमच्या करिअरला मिळू शकते नवी दिशा
misbehavior at toll booth where can you complaint how to deal with toll employees nhai fastag helpline
टोल नाक्यावरील कर्मचारी तुमच्याबरोबर चुकीच्या पद्धतीने वागले तर काय कराल? वाचा सविस्तर
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय
  • प्रत्येक बायकोला वाटतं की नवऱ्याने आपली काळजी घ्यावी. बायको जेव्हा रागात असेल तेव्हा तिला हसवण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे बायकोलाही तुमचे प्रयत्न दिसून येईल
  • जर बायको नाराज असेल तर तिला तुम्ही तिच्या आवडत्या जागी बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता किंवा तिला आवडेल अशी एखादी गोष्ट गिफ्ट देऊ शकता.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)