हिंदू धर्माशी संबंधित विविध धार्मिक पुस्तकांमध्ये दान हे सर्वात मोठे दान मानले गेले आहे. गरजू लोकांना मदत करणे हे मानवाचे पहिले कर्तव्य आहे असे ही म्हटले जाते. तर दान केल्याने मनःशांती मिळते आणि त्यामुळे संपत्तीही मिळते असे मानले जाते. परंतु दानासाठी सर्वच गोष्टी शुभ मानले जात नाही. काही गोष्टी अशा असतात ज्यांचे दान केल्याने घरात गरिबी येते. त्यामुळे दान करण्यापूर्वी ज्या गोष्टींचे दान अशुभ मानले जाते त्या गोष्टींची माहिती जरूर घ्यावी. चला तर मग जाणून घेऊयात की कोणत्या गोष्टी दान नाही केल्या पाहिजे.

झाडू

हिंदू धर्माच्या पुस्तकांमध्ये असा उल्लेख आहे की झाडू घरातील गरिबी दूर करते आणि घरात लक्ष्मी वास करते. झाडू दान करणे अशुभ मानले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी लोकांनी इतर वस्तूंसह झाडू खरेदी करणे आवश्यक आहे कारण असे मानले जाते की यामुळे घराची समृद्धी वाढते. अशा वेळी झाडू दान केल्यास लक्ष्मी घरातून बाहेर पडू लागते.

printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 

प्लास्टिकच्या वस्तू दान करू नका

आजकाल प्रत्येकाच्या घरात प्लास्टिकच्या वस्तु खूप वाढल्या आहेत. अनेक वेळा आपण प्लॅस्टिकच्या वस्तू दानात देतो जे चुकीचे आहे. असे मानले जाते की प्लॅस्टिकच्या वस्तू दान केल्याने घरातील शांतता बिघडते आणि आर्थिक नुकसान होते.

इतरांना शिळे अन्न दान करू नका

अनेक वेळा लोकं भुकेल्या लोकांना शिळे अन्न दान करतात. पण असे केल्याने नुकसान होऊ शकते. कारण असे केल्याने लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवी क्रोधित होतात. असे मानले जाते की असे केल्याने घरात अन्नधान्य आणि पैशाची कमतरता भासू लागते. त्यामुळे कोणत्याही गरजूला शिळे अन्न देऊ नका.

स्टीलची भांडी दान करू नका

घरामध्ये ठेवलेली स्टीलची भांडी दान करणे टाळावे. असे केल्याने धनहानी होते असे मानले जाते. दरम्यान स्टीलची भांडी दान केल्याने घरातील शांततेवरही विपरीत परिणाम होतो.

लक्ष्मीच्या चित्राचे दान

अनेक लोकं लक्ष्मीच्या मूर्तीवर कोरलेली चांदीची नाणी दान करतात. पण असे केल्याने घरातील लक्ष्मी कमी होऊ लागते. असे मानले जाते की असे करणे म्हणजे एखाद्याच्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याच्या घरी देणे. त्यामुळे लक्ष्मीच्या मूर्तीचे दान करू नका.

(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)