Shani Sade Sati 2022: शनिदेवाला न्यायाची देवता मानले जाते. त्यांना एका राशीतून दुस-या राशीत संक्रमण होण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात. २४ जानेवारी २०२२ रोजी शनीचा राशी बदल होणार आहे. आता ज्योतिष शास्त्रानुसार या ग्रहाचा राशी बदल खूप खास मानला जातो. कारण त्याचा परिणाम सर्व लोकांच्या जीवनावर दिसून येतो. जेव्हा जेव्हा शनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा काहींना शनी साडेसाती सुरू होते. जाणून घ्या नवीन वर्षात कोणत्या राशीवर शनीचा प्रभाव असणार आहे.

२०२२ च्या सुरुवातीपासून ते २९ एप्रिलपर्यंत धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना शनी सती असेल. २९ एप्रिल २०२२ रोजी जेव्हा शनि मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल, तेव्हा धनु राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल आणि शनीची ही महादशा मीन राशीपासून सुरू होईल.

(हे ही वाचा: ‘या’ ४ राशींची मुलं वाचन आणि लेखनात मानली जातात हुशार, त्यांना कमी वयात मिळते यश)

१२ जुलै २०२२ रोजी प्रतिगामी शनिमुळे शनि पुन्हा मकर राशीत प्रवेश करेल. या राशीत शनीच्या पुनरागमनामुळे धनु राशीच्या लोकांवर पुन्हा साडेसाती सुरु होईल तर, मीन राशीच्या लोकांना १७ जानेवारी २०२३ पर्यंत शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल.

(हे ही वाचा: Budh Gochar 2022: नवीन वर्षात मेष ते मीन राशीत बुध कधी, केव्हा करणार संक्रमण? जाणून घ्या कोणाला होईल फायदा)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१७ जानेवारी २०२३ रोजी कुंभ राशीत शनि गोचर होऊन पुन्हा भ्रमण सुरू करेल आणि २९ मार्च २०२५ पर्यंत शनीची उपस्थिती या राशीत राहील. यानंतर शनि गुरूच्या राशीत मीन राशीत प्रवेश करेल.