आर्थिक वर्ष २०२१-२२ संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत कर वाचवण्यासाठी आणि ३१ मार्चपूर्वी गुंतवणूक करण्यासाठी मर्यादित वेळ शिल्लक आहे. पुढील आर्थिक वर्षात कर वाचवायचा असेल तर त्यासाठी आत्तापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. जर तुम्ही या गोष्टी वेळेत केल्या नाहीत, तर तुम्ही कर लाभ किंवा इतर कोणताही मोठा फायदा घेण्यापासून वंचित राहू शकता. तुम्हालाही आयकर वाचवायचा असेल, तर तुम्हाला काही गुंतवणुकीच्या टिप्स देणार आहोत यामुळे तुमची आयकर कपात वाढेल.

आयकर कलम ८० सी मध्ये सूट: आयकराच्या कलम ८० सी मध्ये १.५० लाख रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे. ही सूट वाढवण्यासाठी, तुम्ही कलम ८० सीसीडी (१ बी) चा लाभ घेऊ शकता. यामध्ये ही सूट दोन लाख रुपयांपर्यंत वाढते. या सूटसाठी तुम्हाला पीपीएफ आणि एनपीएससारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल.

Is Beetroot Really Vegetable Viagra How Eating Beet Helps For Sex Drive
बीट हे भाजीच्या रूपातील Viagra आहे का? सेक्स लाइफशिवाय बीट खाल्ल्याने काय फायदा होऊ शकतो?
RRB Recruitment 2024
RRB Recruitment 2024: रेल्वे विभागात काम करण्याची सुवर्णसंधी; ८ हजारांवर टीटीई पदांसाठी बंपर भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
Techie doubles his income
वर्षाला १ कोटी रुपये कमावण्यासाठी व्यक्तीने शोधला जुगाड, लाखोंचे शैक्षणिक कर्जही फेडलं, एकाच वेळी केल्या….

आरोग्य विमा प्रीमियम: तुम्ही कलम ८० डी अंतर्गत आरोग्य विम्यासाठी प्रीमियमचा दावा करू शकता. या पॉलिसीमध्ये कोणाचा समावेश आहे आणि त्यांचे वय काय आहे? यावर तुम्हाला ८० डी अंतर्गत किती कर सूट मिळेल, हे अवलंबून असतं. अशा प्रकारे तुम्ही रु.२५,०००, रु. ५०,००० आणि रु. १ लाखांपर्यंत कर बचतीचा दावा करू शकता.

शैक्षणिक कर्ज सवलत: जर तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेतले असेल, तर तुम्ही त्याच्या परतफेडीवर कर सवलतीचा दावा करू शकता. कलम ८० ई अंतर्गत शैक्षणिक कर्जाच्या व्याजाच्या भागावर कर सूट मिळू शकते. या कर सवलतीचा लाभ पालकांना घेता येईल. कर्जाची परतफेड कोण करत आहे यावर ते अवलंबून आहे. कर सवलतीची मर्यादा नाही. तुम्हाला पाहिजे तितक्या व्याजावर तुम्ही कर सूट मिळवू शकता.

क्रेडिट कार्डचा EMI भरण्यास झालाय उशीर, सिविल स्कोअरवर होई शकतो परिणाम; ‘अशी’ करता येईल सुधारणा

चॅरिटीवर आयकर सूट: जर तुम्ही धर्मादाय दान केले तर तुम्हाला आयकर सूटही मिळू शकते. चॅरिटीसाठी काही देणग्यांवर १०० टक्के तर काहींना ५० टक्क्यांपर्यंत सूट मिळते. २ हजार रुपये रोख आणि त्याहून अधिक रकमेच्या धनादेशाद्वारे धर्मादाय संस्थेला दिलेल्या देणग्यांवर आयकर सूट उपलब्ध आहे.