Indian Air Force Day 2023: आज भारतीय हवाई दल दिवस आहे. दरवर्षी अत्यंत उत्साहात ८ ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा केला जातो. यंदा भारत ९१वा भारतीय हवाई दल दिवस साजरा करत आहे. भारतीय हवाई दल हे जगभरातील सर्वात शक्तिशाली हवाई दलांपैकी एक आहे. भारतीय हवाई दलाने अनेकदा आपल्या शौर्य आणि गौरवास्पद कामगिरीने भारतीयांना अभिमान वाटावा असे क्षण दिले आहेत. भारतीय हवाई दलाचे कार्य आणि देशासाठी हवाई दलाने दिलेल्या योगदानाचे कौतूक करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. त्याच बरोबर भारतीय हवाई दलाचा स्थापना दिवसही या दिवशी साजरा केला जातो. यात दिवशी भारतीय सैन्याच्या देशभरातील हवाई दलाच्या लढाऊ विमानाद्वारे प्रात्यक्षिक दाखवले जातात आणि भारकतीय वायुसेनेद्वारा शक्ती प्रदर्शन केले जाते.

हेही वाचा – World Smile Day केव्हा साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

केव्हा झाली होती भारतीय हवाई दलाची स्थापना
भारतीय हवाई दलाची स्थापना ८ ऑक्टोबर १९३२ रोजी केली गेली होती ज्यानंतर दरवर्षी हा दिवस ८ ऑक्टोबरला साजरा केला जातो. भारतीय हवाई दलाचे संस्थापक वायुसेनेचे सुब्रोतो मुखर्जी यांना मानले जाते. स्वातंत्र्यानंतर १ एप्रिल १९५४ रोजी सुब्रोतो मुखर्जी यांना भारतीय हवाई दलाचा पहिले हवाई दल प्रमुख म्हणून नियुक्त केले होते. भारतीय हवाई दलाचे मुख्यालय देशाची राजधानी दिल्ली येथे आहे.

हेही वाचा – World Cotton Day 2023: जागतिक कापूस दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२३मध्ये निवडली ही थीम
कोणताही दिवस साजरा करण्यासाठी त्याची थीम आधी निश्चित केली जाते आणि मग तो दिवस त्या थीमनुसार साजरा केला जातो. भारताच्या ९१व्या वायुसेना दिवसाच्या थीम “IAF – Airpower Beyond Boundaries” म्हणजेच भारतीय हवाई दल- सीमेपलीकडील हवाई दलाची शक्ती’ अशी निश्चित करण्यात आली आहे.