Dal Rice Eating Tips: भारतातील अनेक घरांमध्ये दररोज डाळ-भात आवर्जून बनवला जातो. डाळ आणि भातामध्ये प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्ससह अनेक पोषक घटक असतात. भातामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. भात खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो आणि रक्तातील साखरेची पातळी वाढते, असे म्हटले जाते. परंतु डाळ आणि भाताचे योग्य रीतीने सेवन केले खाल्ले, तर कोणतीही समस्या उदभवत नाही.
डॉ. मल्हार यांच्या मते, बहुतेक लोक डाळ आणि भात खाताना कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनांचे योग्य संतुलन राखत नाहीत. बऱ्याचदा भाताचे प्रमाण जास्त असते; तर डाळीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे प्रथिनांचा स्रोत कमी होतो. बहुतेक भारतीय भात मोठ्या प्रमाणात आणि डाळ कमी खातात. ही चुकीची पद्धत आहे. शरीराला जास्त कार्बोहायड्रेट्सची आवश्यकता नसते. आपण जे कार्बोहायड्रेट्स खातो, ते चरबी म्हणून साठवले जातात, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.
डाळ-भात खाण्याची योग्य पद्धत कोणती?
- एक वाटी भातामध्ये डाळ घ्या. त्याबरोबर तुम्ही जर मांसाहारी असाल, तर अंडी, मांसदेखील खा. अशा प्रकारे तुमच्या प्लेटमध्ये प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण संतुलित करा.
- डाळ व भात अजून पौष्टिक बनविण्यासाठी तुम्ही त्यात हंगामी भाज्या एकत्र करून आणि सॅलडदेखील घालू शकता. डाळ आणि भातामध्ये एक चमचा तूप घाला. त्यामुळे हेल्दी फॅट्स मिळतील.
- तसेच प्रत्येकवेळी मूग किंवा तूरीची डाळ बनवू नका. कधी कधी तूर, मूग आणि मसूर अशी तीन डाळी मिक्स करा. शिवाय डाळीत शेवग्याच्या शेंगादेखील टाका ज्यामुळे डाळ अधिक पौष्टिक होईल.