काही आजार हे फार गंभीर स्वरूप धारण करू शकतात. त्यातील एक आहे संधिवात. या आजारामध्ये सांध्यांना तीव्र वेदना होते. ही समस्या वृद्धापकाळात दिसून येते. परंतु, कधीकधी ही समस्या लहान मुले आणि तरुणांमध्ये देखील दिसून येते. पुरुषांपेक्षा महिलांना संधिवात अधिक होतो. विशेषकरून ज्या महिलांचे वजन अधिक असते त्यांना या समस्येमुळे अधिक त्रास होतो. संधिवात ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये एक किंवा अधिक सांध्यांमध्ये सूज आणि वेदना होते. या आजाराची लक्षणे कालांतराने विकसित होतात.

संधिवाताचे हे आहेत मुख्य प्रकार

sonali khare clarifies age difference between husband and her
“आमच्यात २७ वर्षांचं अंतर नाही”, सोनाली खरेने थेट सांगितली नवऱ्यासह तिची जन्मतारीख; म्हणाली, “बायका त्यांचं वय…”
DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल
health benefits of fenugreek seeds
तुम्ही १४ दिवस मेथीचे दाणे खाल्ले तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
SaReGaMaPa Little Champs Winner singer Kartiki Gaikwad home photos
लवकरच आई होणाऱ्या कार्तिकी गायकवाडचं घर आहे खूपच सुंदर, पाहा फोटो

ओस्टियो संधिवात आणि रुमेटाइड संधिवात हे संधिवाताचे दोन प्रमुख प्रकार आहेत. ओस्टियो संधिवातात स्नायू आणि हडांना जोडणारे लवचिक हाड, ज्यामुळे सांध्यांमध्ये लवचिकता असते ते तुटते. तर रुमेटाइड संधिवात हा एक आजार असून त्यात आपली रोगप्रतिकार शक्ती आपल्याच साध्यांना दुखापत करते. रक्तात अधिक प्रमाणात युरिक अ‍ॅसिड असल्यास युरिक अ‍ॅसिड क्रिस्टल तयार होतात, ज्यामुळे संधिवात होऊ शकते. काही प्रकारचे संसर्ग, सोरायसिस किंवा ल्युपस यांच्यामुळे संधिवात होऊ शकते.

संधिवाताची ही आहेत लक्षणे

सांध्यांमध्ये दुखणे हे संधिवाताच्या प्रमुख लक्षणांपैकी एक आहे. संधिवाताची लक्षणे त्याच्या विविध प्रकारानुसार असू शकतात. ही लक्षणे पुढील प्रमाणे आहेत.

  • सांध्यांमध्ये वेदना, कडकपणा किंवा सूज येणे ही संधिवाताची प्रमुख लक्षणे आहेत. या आजारात रुग्णांचे प्रभावित भाग लाल होतात. रुग्णाला चालता फिरताना त्रास होतो. परिणामी त्याला हळू चालावे लागते.
  • गुडघे, पेल्विक, हाथ, खांदे आणि शरिरात कुठेही संधिवाताच्या वेदना होऊ शकतात. रुमेटाईड संधिवातात व्यक्तीला थकवा अधिक जाणवतो आणि त्याची रोगप्रतिकार शक्ती कमी होते. तसेच व्यक्तीला कमी भूक लागते.
  • संधिवाताने अनिमिया देखील होऊ शकतो. अनिमियामुळे शरिरात रक्त कमी होते. संधिवाताच्या वेदनांनी ताप देखील येऊ शकतो.
  • संधिवात झाल्यावर हाता पायांवर गाठी येतात. यामुळे दैनंदिन कामे करणे त्रासदायक होऊ शकते.

(उच्च कोलेस्टेरॉलमुळे होऊ शकतात हृदयाचे विकार, कमी करण्यासाठी आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा करा समावेश)

या कारणांमुळे होते संधिवात

  • शरिरात कार्टिलेजच्या उत्ती कमी झाल्यास संधिवात होऊ शकते. चालताना सांध्यांवर ताण पडतो आणि हा ताण कार्टिलेजमुळे कमी होतो. याने सांध्यांना त्रास होत नाही. मात्र, कार्टिलेजच्या उत्ती कमी झाल्यास संधिवात होऊ शकतो.
  • लहान जखमांमुळे ओस्टियो संधिवात होऊ शकतो. तसेच, कुटुंबामध्ये कुणाला संधिवाताची समस्या असल्यास दुसऱ्या सदस्याला संधिवात होण्याची शक्यता असते.
  • वृद्धापकाळात ही समस्या अधिक होते. पूर्वी तुमच्या सांध्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली असेल तर ते संधिवाताचे कारण ठरू शकते. तसेच, लठ्ठपणामुळे देखील संधिवात होऊ शकते. अतिरिक्त वजन सांध्यांवर ताण टाकतात.

(सावध व्हा.. ‘या’ संसर्गामुळे महिलेला झाले सेप्सिस, गमवावे लागले हात आणि पाय)

हा आहे उपचार

तुम्हाला संधिवात झाल्यास डॉक्टरांशी संपर्क करा. डॉक्टर सूज कमी करण्यासाठी एनालजेसिक औषधी देऊ शकतात. तसेच प्रभावित भागाला आराम देण्यासाठी जेल देखिल दिले जाऊ शकतात. समस्या गंभीर असल्यास डॉक्टर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देऊ शकतात. शस्त्रक्रियेद्वारे सांध्याचा पृष्ठभाग गुळगुळीत केला जातो, तसेच त्यास पुन्हा संगठित केले जाते. याने वेदना कमी होण्यास मदत मिळते. गुडघ्याच्या बाबतीत शस्त्रक्रिया करून कृत्रिम अवयव लावले जाऊ शकते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)