समाधान राहणं हाच खरा आनंदी आयुष्य जगण्याचा मूलमंत्र आहे, असं अनेक जण सांगतात. एखाद्या झालेल्या अथवा होणाऱ्या घटनेची निष्कारण काळजी, चिंता केल्यामुळे आपला मूड बिघडतो आणि विनाकारण आपण निराश होतो. आपल्या परिणाम आपल्या दिवसाच्या कामकाजावर तर होतोच, शिवाय सभोवतालच्या माणसांनाही आपण नकारात्मक करत असतो. आनंदी राहण्यासाठी पुढील गोष्टी स्वीकारल्यात तर तुम्ही ठरवलं तरी कधी दुःखी होऊ शकणार नाहीत.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
happiness hashtag, balmaifal happiness
सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय

स्वत:चा मार्ग स्वत: निवडणे

आपण नेहमी कोणत्या ना कोणत्या व्यक्तीसारखं होण्याचा प्रयत्न करत असतो. मग ते आई-वडील असतात किंवा मग भाऊ-बहिण, मित्र बॉस, शिक्षक किंवा कलाकार. त्यांचं उठणं बसणं, बोलणं हे सारं आपण बारकाईने पाहतो आणि त्यांचं अनुकरण स्वतःमध्ये करण्याचा प्रयत्न करत असतो. पण एक गोष्ट आपण विसरतो. ज्या व्यक्तींना आपण फॉलो करतो त्या व्यक्तींचं यश हे त्यांनी स्वतःच्या बळावर मिळवलेलं असतं. त्यांना मिळालेलं यश पाहून आणि त्यांना केवळ फॉलो करून आपल्यालाही यश मिळेल, असं नाही. त्यासाठी आपण स्वतः कार्य करणं गरजेचं आहे. ते आपले आयुष्य होऊ शकत नाही. म्हणूनच स्वतःचा मार्ग स्वतः निवडता आला पाहिजे.

वर्तमानात जगणं शिका

अनेकदा आपण भविष्याच्या काळजीने आणि भूतकाळातील आठवणीत राहून आपण वर्तमानात जगणं विसरून जातो. जे मिळालं आहे त्यात समाधान न मानता जे मिळालं नाही त्याचं दुःख मनात घेऊन बसतो. अशा स्वभावामुळे आपण कधी आनंदी राहू शकणार नाही. यासाठी वेळीच आपल्या स्वभावात बदल करा. भूत आणि भविष्याच्या गर्तेतून बाहेर पडून वर्तमानात जगण्याची प्रेरणा आपोआपच मिळते. म्हणूनच, ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्यावर वेळ वाया घालवू नये.

अचानक घडणाऱ्या घटनांनी बिथरून जाऊ नका

आयुष्यात कधी काही कायमस्वरूपी राहत नाही. आज ज्यांचे चांगले दिवस सुरू असतात भविष्यात ते असतीलच असं नाही. तसंच आज जे संघर्ष करत आहेत, तर त्यांना आयुष्यभर संघर्षच करावा लागणार असंही नाही. फक्त प्रत्येकाचा आयुष्यातलं वास्तव स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्यात अनेक घटना घडत असतात. पण अचानक घडणाऱ्या घटनांमुळे स्वतःला कोलमडून देऊ नका. कितीही मोठं संकट कोसळलं तरी त्यावर मात करण्याची तयारी ठेवा. बिथरून जाऊ नका. वाईट वेळ आली तरी त्यातून काही तरी शिकण्याचा दृष्टीकोन ठेवा. ज्यावेळी योग्य निर्णय घेण्याची वेळ येईल त्यावेळी सारासार विचार करून योग्य निर्णय घेण्याची ताकद स्वतःमध्ये ठेवा. तुमच्या आयुष्यातील निर्णय हे इतरांवर कधी सोपवू नका.