बनावट खात्यांवर कारवाईसाठी इन्स्टाग्राम सज्ज; व्हिडिओ सेल्फीद्वारे सत्यता तपासणार

बनवाट आणि स्पॅम खात्यांची संख्या कमी करण्यासाठी इन्स्टाग्राम योजना राबवत आहे.

instagram-logo-ap
बोगस खात्यांवर कारवाईसाठी इन्स्टाग्राम सज्ज; व्हिडिओ सेल्फीद्वारे सत्यता तपासणार (Photo- AP)

सोशल मीडियावर मेटा मालकीचे फोटो-शेअरिंग अ‍ॅप इन्स्टाग्राम खूपच लोकप्रिय आहे. मात्र गेल्या काही दिवसात या अ‍ॅपवर बनावट खात्यांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. यासाठी इन्स्टाग्रामनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. बनवाट आणि स्पॅम खात्यांची संख्या कमी करण्यासाठी योजना राबवत आहे. युजर्सचे खाते सत्यापित करण्यासाठी त्यांना चेहऱ्याचा सर्व बाजूने व्हिडिओ सेल्फी घेण्यास सांगितलं जात आहे. कंपनीने गेल्यावर्षी याबाबतची चाचणी सुरु केली होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे मोहीम थंड पडली होती. आता पुन्हा एकदा इन्स्टाग्रामने मोहीम सुरु केली आहे.

व्हिडिओ रेकॉर्ड झाल्यानंतर युजर्संना ओळख पटवून देण्यासाठी व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर सबमिट करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर कधीही दिसणार नाही आणि ३० दिवसांच्या आत सर्व्हरवरून हटवला जाईल. दरम्यान, लोकांना मेटा-मालकीचा वापर करण्यापासून नियमित ब्रेक घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी दरम्यान ‘टेक अ ब्रेक’ नावाच्या नव्या पर्यायाची चाचणी करत आहे. फोटो-शेअरिंग अ‍ॅप इन्स्टाग्रामचे प्रमुख अ‍ॅडम मॉसेरी यांच्या म्हणण्यानुसार, बहुप्रतिक्षित ‘टेक अ ब्रेक’ पर्याय वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मवर बराच वेळ घालवल्याची आठवण करून देईल.

‘टेक अ ब्रेक’ हा पर्याय डिसेंबरमध्ये उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. इन्स्टाग्राम वापरकर्त्यांसाठी धोकादायक असल्याची टीका होत असताना नवीन पर्याय समोर आला आहे. लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅप्स तरुण लोकांच्या मानसिक आरोग्यावर कसा विपरित परिणाम करू शकतात, असं अमेरिकन व्हिसलब्लोअर फ्रान्सिस हॉगेन यांनी उघड केले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Instagram asking for video selfies to verify identity and reduce fake accounts rmt

Next Story
पुरुषांमध्येही वाढतेय स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण!
ताज्या बातम्या