फेसबुक आणि व्हॉटसअॅपबरोबरच इन्स्टाग्रामही सध्या बरेच फेमस झाले आहे. कधी स्टेटस अपडेट करण्यासाठी तर कधी फोटो आणि व्हिडिओ अपलोड करण्यासाठी या सोशल मीडिया अॅप्लिकेशनचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसतो. सुरक्षेच्या कारणास्तव इन्स्टाग्रामने नुकतेच एक नवीन फिचर लाँच केले आहे. तुमचे फोटो आणि अपडेट कोण पाहतो हे आता समजू शकणार आहे.

आपण फॉलो करत असलेल्या व्यक्तीच्या आयुष्यात सध्या काय सुरु आहे हे समजणे त्यामुळे सोपे झाले आहे. इन्स्टाग्राम स्टोरी अपडेट करण्याचीही सध्या जोरदार फॅशन आहे. आपल्याला कोण फॉलो करते हे समजणे आवश्यक असून इन्स्टाग्रामने त्यादृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. आपल्या युजर्सचा वापर जास्तीत जास्त सोयीचा व्हावा यासाठी सर्वच अॅप्लिकेशन प्रयत्न करत असतात. इन्स्टाग्रामने नुकतेच एक नवीन फिचर लाँच करणार असल्याचे जाहीर केले असून व्हॉट्सअॅपप्रमाणे आता इंस्टाग्रामवरही तुमचे लास्ट सीन दिसणार आहे. अँड्रॉईड आणि आयफोन या दोन्ही सिस्टीमसाठी लवकरच हे फिचर लाँच होणार असून रेकॉर्ड आता यूजर्सला कळू शकणार आहे. हे फिचर लाँच व्हायला वेळ असून त्याच्या डेव्हलपिंगचे काम सुरु असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

याशिवाय अनेकजण एकमेकांच्या फोटोचे स्क्रीनशॉटही काढतात. पण अशाप्रकारे स्क्रीनशॉट काढणाऱ्यांचेही आता रेकॉर्ड ठेवले जाणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणाच्या फोटोंचे स्क्रीनशॉट घेत असाल तर ते तुमच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामने एकमेकांचे लास्ट सीन पाहता येणारे फिचर लाँच केले होते. त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने आता इन्स्टाग्राम अधिकाधिक युजरफ्रेंडली होत असल्याचे म्हणायला हरकत नाही. मात्र प्रत्यक्षात हे फिचर कधी लाँच होणार याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.