कुत्रा हा नेहमी माणसाचा सर्वात चांगला मित्र मानला जातो. २६ ऑगस्ट हा दिवस आपल्या या लाडक्या मित्राला साजरा करण्यासाठी, हा आंतरराष्ट्रीय श्वान दिवस म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय श्वान दिवस हा आजच्या आपल्या कुत्र्यांंच्या साथीदारांचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांना दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी साजरा केला जातो. हा आपला मित्र आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग कसा आहे याची जाणीव करून देण्याचा आणि त्यांना मदत करण्याचा हा दिवस आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व काय आहे?

पाळीव प्राणी व कौटुंबिक जीवनशैली तज्ञ आणि प्राणी बचाव वकील कॉलिन पायगे यांनी अमेरिकेत २००४ मध्ये आंतरराष्ट्रीय श्वान दिवस हा राष्ट्रीय श्वान दिवस म्हणून सुरू केला. २६ ऑगस्टची तारीख तिने निवडली कारण ती तारीख आहे जेव्हा तिच्या कुटुंबाने त्यांचा कुत्रा शेल्टीला प्राणी निवारा गृहातून दत्तक घेतले. तिने या दिवसाची स्थापना कुत्र्यांची सुटका करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी केली आणि त्यांना त्यांच्यासाठी कौतुक म्हणून सुरक्षित वातावरण प्रदान केले. हा दिवस कुत्रा दत्तक घेण्यास प्रोत्साहित करतो आणि पाळीव प्राण्यांच्या दुकानातून कुत्रा खरेदी करण्याच्या संकल्पनेला तीव्र विरोध करतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International dog day 2021 when is dog day history and how to celebrate dog day ttg
First published on: 26-08-2021 at 11:51 IST