दिवाळीनिमित्त गेल्या महिन्यात विशेष ऑफरनुसार ग्राहकांना १५०० रुपयांचा जिओफोन केवळ ६९९ रुपयांमध्ये खरेदी करण्याची ऑफर होती. कंपनीने Jio Phone Diwali 2019 ही ऑफर आणखी महिनाभर वाढवली आहे, परिणामी हा फोन अजून महिनाभर म्हणजे नोव्हेंबर महिन्यात ६९९ रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या विशेष ऑफरनुसार ग्राहकांना १५०० रुपयांचा जिओफोन केवळ ६९९ रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. ही किंमत कंपनीकडून ८०१ रुपयांच्या सवलतीनंतर आहे. यासोबतच ६९३ रुपयांचा अतिरिक्त इंटरनेट डेटाही ग्राहकाला वापरता येईल. यानुसार ग्राहकांना पहिल्या सात रिचार्जवर कंपनीकडून ९९ रुपयांचा अतिरिक्त इंटरनेट डेटा मिळेल. म्हणजेच १५०० रुपयांचा हा फोन खरेदी केल्यास ग्राहकांना १५०० रुपयांचा फायदा होणार आहे. पण, या ऑफरचा लाभ घेण्यासाठी फोन खरेदी केल्यानंतर ग्राहकाला किमान ९९ रुपयांचं रिचार्ज करावं लागेल.

जिओ फोनचे फीचर्स –
-फोनमध्ये 2.4 इंचाचा QVGA डिस्प्ले आहे. यासोबत टी-9 की-पॅड देखील मिळेल.
-पुढील बाजूला 0.3 मेगापिक्सल आणि मागील बाजूला 2 मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेरा आहे.
-512MB रॅम आणि 4GB इंटरनल स्टोरेज
– मायक्रो SD कार्डद्वारे स्टोरेज 128GB पर्यंत वाढवता येईल.
-KaiOS वर हा फोन कार्यरत असेल
-2000mAH क्षमतेची बॅटरी
-4G VoLTE, FM रेडिओ, ब्ल्यु-टूथ, वाय-फाय, जीपीएस आणि एनएफसी यांसारखे फीचर्स

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jio phone diwali 2019 offer extended for another month now you get the jio phone at rs 699 only sas
First published on: 03-11-2019 at 12:54 IST