नोकरीची संधी
सुहास पाटील
अॅटॉमिक मिनरल्स डायरेक्टोरेट फॉर एक्स्ल्पोरेशन अँड रिसर्च, हैद्राबाद (जाहिरात क्र. अटऊ-1/२०१९) पुढील पदांची भरती.
(१) ड्रायव्हर (ऑर्डिनरी ग्रेड) – ३० पदे
(अजा – ३, अज – ४, इमाव – ८, ईडब्ल्यू एस- ३, खुला – १२)
पात्रता – (i) दहावी उत्तीर्ण, (ii) हलकी व अवजड वाहने चालविण्याचा परवाना, (iii) हलकी/अवजड वाहने चालविण्याचा ३ वर्षांचा अनुभव, (iv) मोटर मेकॅनिझमचे ज्ञान. (दोन चाकी वाहन परवाना असल्यास प्राधान्य देण्यात येईल. इंग्रजी/हिंदी भाषेतून फॉर्म्स भरता येणे आवश्यक.)
(२) अप्पर डिव्हिजन क्लार्क – १० पदे.
(अजा – १, अज – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – ३, खुला – २)
पात्रता – पदवी किमान सरासरी ५०% गुणांसह उत्तीर्ण.
(इष्ट पात्रता) – इंग्लिश टायिपग स्पीड ३० श.प्र.मि., कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्सचे ज्ञान (डेटा एन्ट्री अँड डेटा प्रोसेसिंग)
(३) स्टेनोग्राफर ग्रेड-III – ३ पदे
(इमाव – १, खुला – २)
पात्रता – दहावी ५०% गुण आणि शॉर्टहँड इंग्लिश स्पीड ८० श.प्र.मि. आणि इंग्लिश टायिपग स्पीड ३० श.प्र.मि.
इष्ट पात्रता – कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स, डेटा एन्ट्री आणि डेटा प्रोसेसिंगचे ज्ञान.
(४) टेक्निशियन-बी (इलेक्ट्रिकल) – ४ पदे (इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – १)
(५) टेक्निशियन-बी (ड्रिलिंग/डिझेल/ऑटो मेकॅनिक) – १४ पदे
(इमाव – ७, ईडब्ल्यूएस – ३, खुला – ४).
पद क्र. ४ व ५ साठी पात्रता – ६०% गुणांसह दहावी किंवा बारावी (विज्ञान आणि गणित) उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील आयटीआय कोर्स.
(६) सायंटिफिक असिस्टंट-बी (ड्रिलिंग) – १० पदे (अज – २, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – ३, खुला – २)
पात्रता – मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/ड्रिलिंग इंजिनीअरिंग डिप्लोमा किमान सरासरी ६०% गुणांसह उत्तीर्ण.
(७) सायंटिफिक असिस्टंट-बी (फिजिक्स) – १ पद (खुला)
पात्रता – बी.एस्सी. (पीसीएम) सरासरी किमान ६०% गुण.
(८) सायंटिफिक असिस्टंट-बी (सव्र्हे) – २ पदे (इमाव – १, ईडब्ल्यूएस – १)
पात्रता – सिव्हिल/सव्र्हे इंजिनीअरिंग डिप्लोमा किमान सरासरी ६०% गुण.
(९) सायंटिफिक असिस्टंट-बी (इलेक्ट्रिकल) – २ पदे (इमाव – १, खुला – १).
पात्रता – इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा, किमान सरासरी ६०% गुण आवश्यक.
(१०) सायंटिफिक ऑफिस-सी (मेडिकल जनरल डय़ुटी) – २ पदे (इमाव – १, खुला – १)
पात्रता – एमबीबीएस.
वयोमर्यादा –
पद क्र. १ व २ साठी – २७ वर्षेपर्यंत.
पद क्र. ३, ६ ते ९ साठी ३० वर्षेपर्यंत.
पद क्र. १० साठी ३५ वर्षेपर्यंत.
(वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, विकलांग – १०/१३/१५ वर्षेपर्यंत)
(विधवा/परित्यक्ता/ महिला – ३५/३८/४० वर्षेपर्यंत)
वेतन –
पद क्र. १ – पे लेव्हल-२ रु. १९,९००/-
अंदाजे वेतन रु. ३०,०००/-.
पद क्र. २ व ३ साठी पे लेव्हल-४ रु. २५,५००/- अंदाजे वेतन रु. ४०,०००/-.
पद क्र. ४ व ५ साठी पे लेव्हल-३ रु. २१,७००/- अंदाजे वेतन रु. ३५,०००/-.
पद क्र. ६ ते ९ साठी पे लेव्हल-६ रु. ३५,४००/- अंदाजे वेतन रु. ५४,०००/-.
अर्जाचे शुल्क –
पद क्र. १० साठी रु. २५०/-
पद क्र. ६ ते ९ साठी रु. १५०/-, इतर पदांसाठी रु. १००/-
निवड पद्धती –
ड्रायव्हर (ओ.जी.) – लेव्हल-१ टेस्ट – जनरल नॉलेज, जनरल इंग्लिश, अंकगणित, मोटर वेहिकल अॅक्ट आणि लेव्हल-२ – ड्रायिव्हग टेस्ट.
अप्पर डिव्हिजन क्लार्क – लेव्हल-१ ऑब्जेक्टिव्ह टेस्ट (जनरल इंग्लिश, जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स अँड रिझिनग, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिटय़ूड (अंकगणित)). लेव्हल-२ इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन (डिस्क्रिप्टिव्ह लेखी परीक्षा) अंतिम निवड लेव्हल-२ च्या कामगिरीवर आधारित.
स्टेनोग्राफर ग्रेड-२ – लेव्हल-१ – ऑब्जेक्टिव्ह टेस्ट (जनरल इंग्लिश, जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स अँड रिझिनग, अंकगणित). लेव्हल-२ स्टेनोग्राफी स्किल टेस्ट. अंतिम निवड लेव्हल-१ व लेव्हल-२ मधील कामगिरीवर आधारित.
टेक्निशियन-बी – स्टेज-१ – प्रीलिमिनरी टेस्ट – ऑब्जेक्टिव्ह टाईप ५० मल्टि चॉईस प्रश्न वेळ १ तास. (गणित – २० प्रश्न, विज्ञान – २० प्रश्न, जनरल अवेअरनेस – १० प्रश्न) स्टेज-२ – अॅडव्हान्स्ड् टेस्ट – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ५० प्रश्न. स्टेज १ व स्टेज २ साठी प्रत्येक प्रश्नाला ३ गुण दिले जातील. प्रत्येक चुकीच्या उत्तराला १ गुण वजा केला जाईल. स्टेज-३ – ट्रेड/स्किल टेस्ट फक्त पात्रता स्वरूपाची. अंतिम निवड स्टेज-२ मधील गुणवत्तेनुसार.
सायंटिफिक ऑफिसर-बी/सायंटिफिक असिस्टंट-बी – लेखी परीक्षा आणि मुलाखत. अंतिम निवड मुलाखतीमधील गुणवत्तेनुसार.
ऑनलाइन अर्ज www.amd.gov.in या संकेतस्थळावर दि. १० जानेवारी २०२० (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.
uhassitaram@yahoo.com