Jugaad Video : सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी फ्रिजचे पाणी पिणे सुरू झाले पण अनेकांना फ्रिजचे पाणी प्यायल्यानंतर सर्दी होते त्यामुळे लहान मुले किंवा वृद्ध माणसं हे सहजा माठातील पाणी पितात. खरं तर फ्रिजच्या पाण्यापेक्षा माठातील पाणी हे कधीही चांगले आहे पण माठापेक्षा फ्रिजचे पाणी जास्त थंड असते त्यामुळे अनेक जण इच्छा नसतानाही फ्रिजचं पाणी पितात पण तुम्हाला फ्रिजपेक्षाही थंड माठाचे पाणी प्यायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण एक अशी ट्रिक जाणून घेणार आहोत ज्याच्या मदतीने तुमच्या माठात फ्रिजसारखं थंड पाणी राहील.

जाणून घ्या ट्रिक

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेने ट्रिक सांगितली आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की ही महिला सुरूवातीला एक माठ घेते आणि माठाला मीठ लावून स्क्रबनी घासते. असे केल्याने माठाची बंद छिद्र उघडतात. यामुळे माठातील पाणी आपल्याला थंड मिळेल. त्यानंतर माठ पुर्णपणे भरून एका मोठ्या पाण्याने भरलेल्या टबमध्ये २० मिनिटे ठेवा. त्यानंतर एका ग्लासमध्ये पाणी घ्या आणि त्यात मीठ टाका. हे मीठाचे पाणी खाली माठात टाका आणि पाच मिनिटे ठेवा. त्यानंतर माठ स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर शेवटी पोत्याचा कापड घ्या आणि पाण्यात भिजवा. पोत्याचा कापड नीट पिळून घ्या आणि ज्या ठिकाणी माठ ठेवायचा आहे तिथे टाका आणि त्यानंतर त्या कापडावर माठ ठेवा. त्या माठात पाणी भरा. रात्रभर तुम्ही असा माठ ठेवला तर सकाळी फ्रिजपेक्षाही जास्त थंड माठाचे पाणी तुम्ही शकता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा : उन्हाळ्यात थंडगार बर्फाचे पाणी पित आहात? आजचं सोडा ही वाईट सवय, तज्ज्ञांनी सांगितले कारण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

awesomekichenfoods या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कितीही जुना माठ असला तरी फक्त एक गोष्ट टाकल्याने माठातील पाणी थंड फ्रिजसारखे थंड होऊ शकते”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने लिहिलेय, “मला आयडिया आवडली” तर एका युजरने लिहिलेय, “मस्त जुगाड” आणखी एका युजरने लिहिलेय, “खरंच पाणी थंड झाले, मस्त”