Sandwich Dosa Recipe In Video: आज ना जरा काहीतरी वेगळं खायची इच्छा आहे.. हे एक वाक्य साधारण प्रत्येक घरात ऐकायला येतं. तुम्ही जर जेवण बनवणाऱ्यांमधले असाल तर तुमच्याकडे व नुसतं जेवणारे असाल तर तुमच्याकडूनही अशी इच्छा काही ना कधी व्यक्त झालीच असेल. खरं आहे म्हणा, रोज रोज तेच तेच खाल्लं की कंटाळा हा येणारच. पण वेगळं खायची इच्छा काहीतरी भन्नाट उपाय करून घरी पूर्ण केली तरच फायद्याचं, नाहीतर ऑर्डर करायला फक्त एकदा सुरुवात झाली की सलग कितीतरी दिवस आपण फक्त डिलिव्हरी बॉयला पत्ता सांगण्यातच घालवतो. तुम्हाला पण असं काहीतरी नवीन आणि वेगळं खायचं असेल तर आज आम्ही आपल्याला इंस्टाग्रामवर व्हायरल होणारी एक रेसिपी दाखवणार आहोत.

आतापर्यंत सँडविच, डोसा हे पदार्थ तुम्ही वेगवेगळे खाल्ले असतील. अगदी क्वचित कुठेतरी सँडविच डोसा म्हणजे डोश्यामध्ये बटाट्याच्या पिवळ्या भाजीबरोबर सँडविचचं सामान सुद्धा वापरून बनवलेली रेसिपी सुद्धा ऐकून असाल पण आज आपण अशी रेसिपी बघणार आहोत जी कमाल कल्पकता वापरून बनवली आहे. इंस्टाग्रामवर @noori_Kitchen वर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये डोश्याचं पीठ आणि सॅन्डविच बनवायचा टोस्टर वापरून हा डोसा कम सँडविच प्रकार बनवला आहे.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
this unique way of crossing road was seen for the first time you will not stop laughing after watching video
VIDEO : … तर गाडीची काच फुटलीच म्हणून समजा; रस्ता ओलांडण्याची ‘ही’ पद्धत तुम्ही कधी पाहिली का?

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता सर्वात आधी चौकोनी आकाराच्या टोस्टरमध्ये डोश्याचे पीठ टाकून त्यावर या शेफने सँडविचमध्ये वापरले जाणारे पदार्थ टाकले. चिली फ्लेक्स, भाज्या, शेजवान चटणी आणि चीजची एक स्लाइस घालून मग त्यांनी पुन्हा वरून डोश्याचं पीठ घालून घेतलं. मग यावार कोथिंबीर भुरभुरून त्यांनी टोस्टरचं झाकण लावलं आणि दोन्ही बाजूंनी सँडविच सारखं भाजून घेतलं. जेव्हा शेफने हा टोस्टर उघडला तेव्हा त्याला डोश्याचा क्रिस्प आणि सँडविचसारखं ग्रील दिसत होतं. विशेष म्हणजे जेव्हा शेफने हे सँडविच मधोमध त्रिकोणी कापते तेव्हा अगदी कॅफेमध्ये मिळतं तसं क्लब सँडविच आपल्याला दिसतं.

सँडविच डोसा Video रेसिपी

हे ही वाचा<< २५ किलो वजन कमी करताना करिश्मा कपूरने रात्रीच्या जेवणात खाल्ले ‘हे’ दोन पदार्थ; भातप्रेमींनो तुम्ही तर वाचाच

ही रेसिपी पाहून अनेकांनी या कल्पकतेचे कौतुक केले आहे. या रेसिपीला खरोखरच वेगळं नाव द्यायला हवं, मैदा टाळण्यासाठी हा भारी जुगाड आहे, असा कमेंट करत अनेकांनी ही रेसिपी आपणही करून पाहणार असल्याचं लिहिलं आहे.