Happy Kargil Vijay Diwas 2025 Wishes : ‘कारगिल विजय दिवस’ ही भारताच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखी घटना आहे. यंदा २६ जुलै रोजी देश २६ वा कारगिल विजय दिवस साजरा करत आहे. हा दिवस भारतीय सैन्यातील शूर सैनिकांच्या शौर्य, पराक्रमाला सलाम करण्याचा दिवस आहे. आजपासून २६ वर्षांपूर्वी पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले. त्यानंतर २६ जुलै या दिवशी भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैन्याला धूळ चारून कारगिलच्या पर्वतरांगांवर पुन्हा आपला तिरंगा फडकवला.यामुळे दरवर्षी २६ जुलै हा दिवस आपण ‘कारगिल युद्ध दिवस’ म्हणून साजरा करतो. हा दिवस देशासाठी लढणाऱ्या आणि संरक्षणासाठी बलिदान दिलेल्या शूरवीर जवानांची आठवण करुन देतो.

कारगिल विजय दिनाच्या या खास प्रसंगी तुम्हीही सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्रपरिवारास देशभक्तीपर शुभेच्छा संदेश पाठवू शकता, तसेच जवानांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या बलिदानाचे स्मरण करु शकता. (Kargil Vijay Diwas Wishes)

कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा ( Kargil Vijay Diwas 2025 Messages in Marathi)

कारगिल युध्दात शहिद झालेल्या सर्व जवानांना माझा कोटी कोटी प्रणाम!

कारगिल विजय दिवस
आपल्या देशासाठी लढणाऱ्या
भारतीय वीर सशस्त्र दलाच्या
सर्व शूर सैनिकांना माझा सलाम
कारगिल विजय दिनानिमित्त विनम्र अभिवादन

उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला
कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

शौर्य, पराक्रम आणि देशाच्या
शुर सैनिकांच्या बलिदानाचे प्रतिक
कारगिल विजय दिवस
मातृ भूमीच्या रक्षणासाठी आपल्या
प्राणाचे बलिदान दिलेल्या अमर
शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली

कारगिल युद्धा शहीद वीर जवानांना माझा प्रणाम…
देशासाठी केलेल्या तुमच्या बलिदानाला शत शत सलाम…
कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा!

कारगिल विजय दिनानिमित्त देशभक्तीपर शुभेच्छा (Kargil Vijay Diwas 2025 Wishes in Marathi)

कारगिल स्वातंत्र्यासाठी
अनेकांनी केला होता त्याग
वंदन करुनिया तयांसी
आज ठेवूनी त्यांच्या बलिदानाची जान
करुया भारत देशा असंख्य प्रणाम
कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा!

हिमालयापेक्षा उंच साहस ज्यांचे
देशासाठी सर्वोच्च बलिदान ज्यांचे
अशा भारताच्या वीर जवानांना
कारगिल विजय दिवसाच्या शुभेच्छा!

जिथे वाहते शांततेची गंगा
तिथे करून नका दंगा….
भगवा आणि हिरव्यात, करु नका भेदभाव
तिरंगा लहरु दे, शांतता राहू दे
सर्वांना विजय दिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला,
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरामुळे हा देश अखंड राहिला,
कारगिल विजय दिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

वतन पर मिटने वालों का यही निशान बाकी होता
हैसिर पर सेना की पगड़ी
और बदन पर तिरंगा का कफन होता है
कारगिल विजय दिवसाच्या शुभेच्छा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राणांची बाजी लावून
पाकिस्तानच्या चारी मुंड्या चित करुन
विजय मिळवणाऱ्या वीर जवानांना
शत शत प्रणाम! जय हिंद!