‘या’ स्टार्टअपने ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप’ स्पर्धेत मारली बाजी, सरकारने केली निवड

पाचपैकी एका स्टार्टअपने मारली बाजी, मिळणार एक कोटी रुपये

डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सुरक्षित ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग App’ डेव्हलप करण्याच्या स्पर्धेत केरळच्या टेकजेनसिया सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडने (अलाप्पुझा) बाजी मारली आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी गुरूवारी या स्पर्धेच्या विजेत्याची घोषणा केली. विजेत्याला एक कोटी रुपये प्रोडक्टसाठी दिले जाणार आहेत. तसेच पुढील तीन वर्षांपर्यंत प्रोडक्टच्या देखभाल-दुरुस्तीसाठी अतिरिक्त 10 लाख रुपये दिले जातील.

इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सुरक्षित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म डेव्हलप करण्यासाठी 12 एप्रिल रोजी या स्पर्धेची घोषणा केली होती. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला व जवळपास १९८३ अर्ज आले होते. त्यापैकी जुलैमध्ये फक्त – पीपललिंक युनिफाईड कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (हैदराबाद), सर्व वेब्ज प्रायव्हेट लिमिटेड (जयपूर), टेकजेनसिया सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (अलाप्पुझा), इन्ट्रिव्ह सॉफ्टलॅब्ज प्रायव्हेट लिमिटेड (चेन्नई) आणि साउलपेज आयटी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड (हैदराबाद) या पाच कंपन्यांची मंत्रालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म डेव्हलप करण्यासाठी निवड केली होती. या पाचपैकी टॉप तीन स्टार्टअप्सना प्रत्येकी २० लाख रुपये, तर अन्य दोन स्टार्टअप्सना प्रत्येकी १५ लाख रुपये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप डेव्हलप करण्यासाठी देण्यात आले होते.

आता त्यातील केरळच्या टेकजेनसिया सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडला विजेता घोषीत करण्यात आले आहे. याशिवाय सर्व वेब्ज प्रायव्हेट लिमिटेड (जयपूर), पीपललिंक युनिफाईड कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (हैदराबाद) आणि इन्ट्रिव्ह सॉफ्टलॅब्ज प्रायव्हेट लिमिटेड (चेन्नई) या तीन स्टार्टअप्सनाही प्रत्येकी 25 लाख रुपये दिले जाणार आहेत. त्यांनी डेव्हलप केलेल्या प्रोडक्टमध्ये अजून योग्य सुधारणा करण्यासाठी हे पैसे दिले जाणार आहेत. तर, विजेता ठरलेल्या टेकजेनसियाला एक कोटी रुपये प्रोडक्टसाठी दिले जाणार आहेत. तसेच पुढील तीन वर्षांपर्यंत प्रोडक्टच्या देखभाल-दुरुस्तीसाठी अतिरिक्त 10 लाख रुपये दिले जातील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kerala based techgentsia software technologies startup wins innovation challenge for developing video conference solution sas

Next Story
एचआयव्ही परिक्षणाने भारतात वाचतील लाखो प्राण
ताज्या बातम्या