Kia Seltos SUV ही नवीन कार आज (दि.22) भारतात लाँच झाली आहे. 9.69 लाख ते 15.99 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरुम) या बहुप्रतिक्षित कारच्या विविध व्हेरिअंट्सची किंमत ठरवण्यात आली आहे. दोन डिझाइनच्या पर्यायांसह ही कार भारतीय बाजारात उतरवण्यात आली असून दक्षिण कोरियाची ख्यातनाम कंपनी असलेल्या Kia Motors ची ही भारतातील पहिलीच कार आहे. बाजारात या कारची एमजी हेक्टर, टाटा हॅरियर आणि ह्युंडई क्रेटा यांसारख्या एसयूव्हीशी स्पर्धा असेल. विविध सात रंगांच्या पर्यायांमध्ये ही कार उपलब्ध असणार आहे. या कॉम्पॅक्ट एसयूव्हीसाठी 16 जुलैपासूनच बुकिंग सुरू होतं. लाँचिंगआधीच या कारची ग्राहकांना भुरळ पडल्याचं दिसत असून जवळपास 25 हजार ग्राहकांनी आगाऊ नोंदणी केली आहे. लाँचिंगनंतर ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत ही कार ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास सुरूवात केली जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टेक लाइन आणि जीटी लाइन अशा दोन डिझाइनमध्ये ही कार लाँच करण्यात आली आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकारात एखादं मॉडल दोन डिझाइनच्या पर्यायांसह लाँच केली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. टेक लाइन अधिक प्रीमियम आणि फॅमिली-ओरिएंटेड स्टायलिंग पॅकेजसह आहे. तर, जीटी लाइनची स्टाइल स्पोर्टी आहे. याद्वारे तरुणांना आकर्षित करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. टेक लाइनमध्ये पाच व्हेरिअंट आणि जीटी लाइनमध्ये तीन व्हेरिअंटचे पर्याय उपलब्ध आहेत.

किआ सेल्टॉसच्या इंजिनचे तीन पर्याय आहेत. यामध्ये 1.4-लिटर पेट्रोल टर्बोचार्ज्ड, 1.5-लिटर पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल इंजिनचा समावेश आहे. सर्व इंजिन ‘भारत स्टेज 6’ (बीएस 6) मानकांनुसार आहेत. ह्युंडई क्रेटासारख्या प्लॅटफॉर्मवर Seltos आधारीत आहे. तुलनेने सेल्टोस नक्कीच थोडीफार मोठी आहे. 1.5-लिटरच्या पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह 6-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन स्टँडर्ड असून दोन्ही इंजिनमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय देखील उपलब्ध आहे. 1.4-लिटर टर्बोचार्ज्ड इंजिनसह 7-स्पीड ड्युअल क्लच ट्रांसमिशनचा पर्याय आहे.

कनेक्टेड कार –
ही कनेक्टेड कार आहे. यामध्ये UVO Connect नावाची एक कनेक्टिव्हिटी सिस्टिम आहे. यात नेव्हिगेशन, सेफ्टी-सिक्युरिटी, व्हेइकल मॅनेजमेंट, रिमोट कंट्रोल आणि कनव्हिनियन्स या 5 श्रेणीअंतर्गत 37 फीचर्स देण्यात आलेत. अँड्रॉइड ऑटो, अॅपल कार-प्ले आणि नेव्हिगेशनसह 10.25 इंच टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टिम, 8-स्पीकर साउंड सिस्टिम, एअर प्यूरिफायरसाठी रिमोट कंट्रोल, रिमोट इंजिन स्टार्ट-स्टॉप, व्हेइकल ट्रॅकिंग, व्हॉइस कमांड, 8-स्पीकर साउंड सिस्टिम, 360 डिग्री सराउंड कॅमेरा, 6-एअरबॅग, एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, व्हेइकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट, हिल स्टार्ट असिस्ट, फ्रंट व रिअर पार्किंग सेंसर्स आणि ब्लाइंड स्पॉट व्ह्यू मॉनिटर यांसारखे फीचर्स आहेत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kia seltos suv launched in india know price and all specifications sas
First published on: 22-08-2019 at 14:32 IST