Kitchen Cooling Tips For Summer : उन्हाळ्यात दुपारच्या वेळी कूलर किंवा एसीशिवाय घरात राहणं अशक्य वाटतं. अशा परिस्थितीत किचनमध्ये स्वयंपाक करणं तर त्याहून अवघड काम असतं. आधीच उष्णता, त्यात गॅसमधून निघणारी धगधगती आग, जेवण बनवताना त्यातून निघणारी गरम वाफ; अशा सर्व गोष्टींमुळे शरीराची लाही लाही होते. पण, तुम्ही काही सोप्या टिप्स वापरून उन्हाळ्यातही स्वयंपाकघर थंड ठेवू शकता आणि आरामात स्वयंपाक बनवू शकता.

उन्हाळ्यात स्वयंपाक घर थंड ठेवण्यासाठी फॉलो करा या टिप्स ( Keeping the Kitchen Cool During a Heat Wave)

१) सुती कापडाचे पडदे आणि उष्णता कमी करणारी रोपं लावा

स्वयंपाकघरात मोठ्या खिडक्या असतील तर दिवसा म्हणजे दुपारच्या वेळी त्या बंद ठेवा. तसेच उष्णता रोखण्यासाठी खिडक्यांना हलक्या रंगाचे सुती कापडाचे पडदे लावा. तुम्ही खिडक्यांमध्ये इनडोअर कूलिंग प्लांट्सदेखील ठेवू शकता. या रोपांमुळे घरातील वातावरण थंड आणि अधिक आरामदायक बनू शकते, तसेच तुम्ही स्वयंपाक घराबाहेरदेखील काही रोपे लावू शकता. तसेच स्वयंपाकघरातील उष्णता बाहेर काढण्यासाठी वेळोवेळी खिडकी उघडी ठेवा.

२) चिमणी आणि एक्झॉस्ट फॅन वापरा

जर तुमच्या स्वयंपाकघरात चिमणी किंवा एक्झॉस्ट फॅन असेल तर उन्हाळ्यात त्यांचा वापर नक्कीच करा, यामुळे स्वयंपाकघरातून निघणारा धूर, वाफ आणि ओलावा कमी करण्यास मदत होते. तसेच जेवण बनवताना घाम येत नाही. चिमणी किंवा एक्झॉस्ट फॅनमुळे तुमचे स्वयंपाकघर तर बराच काळ थंड राहते आणि तुम्हालाही स्वयंपाक करताना अस्वस्थता जाणवणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३) दुपारच्या आधी जेवण बनवा

दुपारी कडक ऊन सुरू होण्याआधी म्हणजे सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत जेवण बनवू नका, कारण या वेळेत खूप उष्णता जाणवते; म्हणून उष्णतेपासून बचाव करण्यासाठी सकाळी लवकर स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करा. बरेच लोक सकाळी ११ ते दुपारी १ च्या दरम्यान दुपारच्या जेवणाची तयारी सुरू करतात, जेव्हा सूर्यप्रकाश सर्वात जास्त असतो. नाश्ता बनवल्यानंतर दुपारचे जेवणही लवकरात लवकर बनवण्याचा प्रयत्न करा, विशेषतः असे पदार्थ, जे शिजण्यास जास्त वेळ लागतो.