Garlic peel simple tips: बऱ्याच भाज्या लसणाच्या फोडणीशिवाय अपूर्ण असतात. त्यामुळे भाजीची चव वाढवण्यासाठी भाजीमध्ये लसूण आवर्जून टाकला जातो. लसूण खाण्याची आवड असलेले लोक आवडीची भाजी नसल्यास लसणाची चटणी खाणे अधिक पसंत करतात. खरं तर, लसणामुळे एखादा पदार्थ अधिक चविष्ट होत असला तरी तो सोलणे हे खूप त्रासदायक काम वाटते. लसणाच्या लहान लहान पाकळ्या सोलण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी लसूण सोलणे सोपे करणारे उपाय घेऊन आलो आहोत.

लसूण सोलण्याच्या सोप्या टिप्स

जर तुम्हाला लसूण लगेच सोलायचा असेल, तर प्रथम त्याचा वरचा भाग कापून घ्या आणि नंतर तो सुरुवात करा. असे केल्यामुळे लसूण सोलणे खूप सोपे होईल.

सर्वप्रथम एका भांड्यात पाणी घ्या. त्यात एक तासभर लसणाच्या कांद्यातील वेगळ्या केलेल्या पाकळ्या भिजत ठेवा. आता एक तासानंतर त्या पाकळ्या पाण्यातून बाहेर काढा आणि एकेक पाकळी दाबा. बघा साल लगेच वेगळी होत असल्याचे तुमच्या लक्षात येईल.

जर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात लसूण सोलायची असेल तर ही पद्धत खरोखरच उपयुक्त आहे. लसणाच्या पाकळ्या काढा आणि त्या मायक्रोवेव्हमध्ये ३० सेकंदांसाठी ठेवा. त्यामुळे लसूणाची साल थोडी भाजली जाईल आणि लसूण सोलणे सोपे होईल. परंतु, जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल, तर त्याऐवजी तुम्ही तवा किंवा कढईचाही वाप करू शकता.

लसूण सोलण्यासाठी तुम्ही आणखी एक उपाय करू शकता. त्यासाठी एक बॉक्स घ्या. त्यात लसूण घाला आणि झाकण बंद करा. त्यानंतर तो बॉक्स जोरात हलवा. त्यामुळे लसणाच्या बऱ्याच साली निघून जातात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लसूण सोलताना जर तुम्हाला बोटांना चिकट वाटत असेल, तर तुम्ही थोडे तेल लावून लसूण सोलू शकता. हे सोपे उपाय तुम्हाला कमी वेळात लसूण सोलण्यास मदत करतील.