Trending News : जर तुम्हाला भांडी घासताना खूप त्रास होतो का? मग हा लेख तुमच्यासाठीच आहे. भांडी घासणे फार त्रासदायक काम आहे, विशेषत: जर खराब झालेला तवा घायची वेळ येते तेव्हा….तुम्ही जर हे काम कधीही केले असेल तर तुम्हाला त्याची नक्कीच कल्पना असेल. तवा घासून घासून आपल्या हाताची आग होते पण तवा काही साफ होत नाही.

स्वयंपाकघरातील तवा हे असे भांडे आहे जे रोज वापरले जाते मग ते भाकरी करण्यासाठी असो, चपाती करायची असो किंव डोसा करायाचा असतो. काही जण चपाती, भाकरी डोसासाठी वेगवेगळे तवे वापरतात पण काहीजण एकाच तव्यावर सर्वकाही करतात. एवढंच नव्हे तर अनेकदा तव्यातच भाजी गरम कर, भात गरम कर असेही प्रकार करतात. घाईच्या वेळी कदाचित ते काम सोपे करत असेल किंवा फार भांडी नको म्हणून तुम्ही एकाच तव्यात भाकरी आणि भाजी करत असाल पण त्यामुळे तुमचा तवा मात्र खराब होतो. तव्याचा कसाही वापर केल्याने तव्यावर तेलकट थर जमा होतो. अनेकदा तव्यावर भाकरी किंवा चपाती भाजताना करपते त्यामुळे तव्यावर काळपट थरही जमा होतो.

हेही वाचा – पाणी वापरून बनवा तूप! विश्वास बसत नाहीये मग ‘ही’ सोपी ट्रिक एकदा वापरून बघा; पाहा Viral Video

अनेकदा घाईच्या वेळी तवा नीट साफही केला जात नाही आणि हा थर आणखी घट्ट होऊन जातो आणि सहजासहजी निघत नाही. आणि जेव्हा एखाद्या दिवशी तुम्ही तवा साफ करायाला घेता तेव्हा घासून घासून हात दुखायला लागतात पण तवा मात्र सहजा सहजी साफ होत नाही. वेळ वाया जातो तो वेगळाच. पण काळजी करू नका. आम्ही तुम्हाला आज एक भन्नाट ट्रिक सांगणार आहोत जी तुमचा वेळही वाचवेल आणि तुमचा तवाही साफ करेल. त्यासाठी तुम्हाला फार कष्टही घ्यावे लागणार नाही किंवा तुम्हाला काहीही खर्च करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त एक कप चहा करायचा आहे बास.

तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, चहा आणि तवा साफ करण्याचा काय संबध आहे. तीच तर ट्रिक आहे. चहा पावडर वापरून तुम्ही तुमचा तवा झटपट साफ करू शकता. चहा तर आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाच्या घरात तयार केला जातो. चहा तयार केल्यानंतर जर तुम्ही जर चहा पावडर फेकून देत असाल तर असे करू नका. हीच चहापावडर तुम्ही तवा साफ करण्यासाठी वापरू शकता.

हेही वाचा – गरम तव्यावर बेसनपीठाबरोबर टाका ही गोष्ट; ५ मिनिटांत तेलकटपणा होईल गायब

चहापावडरने तवा साफ कसा करावा?

गॅसवर तवा गरम करायाला ठेवात. तवा गरम झाल्यावर उकळलेल्या चहाची चहापावडर तव्यावर टाका त्यावर थोडे मीठ टाका. आता घासणी चहा पावडर मीठ एकत्र करून संपूर्ण तव्यावर पसरवा आणि तवा घासा. थोडासा धूर यायला लागला की गॅस बंद करा आणि चहापावडर काढून टाका. तवा गरम केल्याने चिकटपणा कमी होईल आणि चहापावडरस निघून जाईल. आता पाण्याने तवा स्वच्छ धूवून घ्या. तव्याचा चिकटपणा आणि तेलकटपणा निघून जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युट्यूबवर@AvikaRawatFoods नावाच्या पेजवर ही ट्रिक सांगितली आहे. ही ट्रिक उपयूक्त आहे की नाही तुम्ही स्वत: वापरून पाहू शकता.