How To Avoid Potatoes Sports: जर घरात बटाटा असेल तर कधीच जेवायला काय करू किंवा रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आलाय असं म्हणण्याची वेळ येत नाही. याचं कारण म्हणजे एकतर बटाट्यापासून असंख्य रेसिपी बनवता येतात. कधी भाजी, भजी, कोफ्ता, काप, करून बटाट्याला हिरो बनवता येतं. तर कधी भातात, आमटीत, रस्स्यात, बेसनाच्या पोळ्यात सहकलाकाराची भूमिका देत सुद्धा बटाटा वापरता येतो. कमी तिथे आम्ही या वाक्याला साजेसं बटाट्याचं काम असतं. आता इतके उपयोग पाहता साहजिकच बटाटे विकत घेताना अधिक प्रमाणात घेतले जातात. आणि हे प्रमाण बघता काही वेळा हेच बटाटे साठवून ठेवताना अडचणी येऊ लागतात. सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे बटाट्याला कोंब येणे किंवा बटाटे हिरवे पडणे, सडणे. हे कोंब आलेले बटाटे अनेकजण फक्त कोंब काढून टाकून खातात सुद्धा पण हे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. आज आपण म्हणूनच बटाटे घरी आणताच करता येतील असे काही सोपे उपाय पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला खराब बटाट्यामुळे वाया जाणारे पैसे आणि आजारी पडल्यास वाया जाणारे दिवस दोन्ही वाचवायला मदत होऊ शकते.

मसाला किचन बाय पूनम देवनानी या इंस्टाग्राम अकाउंटवर यासाठी एक ट्रिक शेअर केलेली आहे. जेव्हा बाजारात बटाटे मोठमोठ्या पेट्यांमधून आणले जातात तेव्हा सुद्धा हाच उपाय वापरला जातो जेणेकरून बटाट्यांना कोंब येण्याची शक्यता कमी होते. यासाठी आपल्याला घरातील रद्दी कमी येईल. या रद्दीतील कागदांचे तुकडे करून आपल्याला बटाट्याच्या परडीत ठेवायचे आहेत. यामुळे बटाट्यामध्ये ओलसरपणा राहण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे बटाट्यांना कोंब येण्याचे प्रमाण कमी होते.

बटाटा साठवून ठेवताना पण आपल्याला काळजी घ्यायला हवी. आपण फ्रीजमध्ये बटाटे ठेवू नयेत कारण यामुळे मॉइश्चर पकडले जाण्याची शक्यता असते. हा ओलसरपणा कोंब येण्यास कारण ठरतो. तसेच बटाटे कधीच पालेभाज्या किंवा फळांसह एका परडीत ठेवू नये. फार उबदार किंवा बंद जागेत सुद्धा बटाटे साठवू नका.

हे ही वाचा<< तुमचं शरीर किती थकतंय? ‘ही’ लक्षणे लगेच ओळखा; डॉ. मेहतांनी सांगितलं व्यायाम व कामाच्या वेळेचं परफेक्ट सूत्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्हाला या टिप्स या कशा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच अशाच नवनवीन किचन टिप्स व जुगाडांसाठी लोकसत्ता.कॉमच्या लाइफस्टाइल पेजला नक्की भेट द्या.