Kitchen jugaad Video: भारतीय महिलांमध्ये कपाळाला टिकली लावण्याची परंपरा दिसून येते. आपल्याकडे कपाळाला टिकली लावणे हा एक आपल्या संस्कृतीचा भाग मानला जातो. कपाळावर टिकली शिवाय एखाद्या महिलेचा शृगांर अपूर्ण राहिल्यासारखा वाटतो. टिकलीने प्रत्येक महिलेचे सौंदर्य अधिक खुलले जाते. कपाळावर लावण्यात येणारी ही टिकली तुम्ही कधी घरातील चमचा किंवा चिमट्याला लावून पाहिली आहात का? तुम्हीही विचारात पडले असेल ना की, आम्ही तुम्हाला असं विचित्र काय सांगतोय, पण चमचा किंवा चिमट्याला टिकली लावण्याचा मोठा फायदा आहे. एका गृहिणीने हा जबरदस्त असा जुगाड दाखवला आहे. याचा परिणाम असा आहे की, पाहूनच तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. किचन जुगाडाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
चमचा आणि टिकली तसा दोघांचाही एकमेकांशी काहीच संबंध नाही. पण जर का तुम्ही या दोघांचा हा उपाय एकदा पाहिला तर तो पुन्हा पुन्हा कराल, असे गृहिणीचे म्हणणे आहे. आता चमचा किंवा चिमट्याला टिकली लावण्याचा काय फायदा आहे, हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. चला तर मग या व्हिडीओमध्ये काय आहे पाहुयात.
व्हिडीओत तुम्ही पाहाल तर गृहिणीने एक चिमटा घेतला आहे आणि त्यावर दोन्ही बाजुने लसूणचा रस चोळला आहे. मग गॅसवर महिलेने चिमट्याला थोड गरम केलं आहे. त्यानंतर महिलेने चिमट्यावर पाकिटातील सर्व टिकल्या लावल्या आहेत. थोडा वेळ तसचं ठेवून महिलेने त्या चिमट्यावरिल सर्व टिकल्या काढून पुन्हा पाकिटाला लावल्या आहेत, असं व्हिडिओमध्ये दिसत आहे. पण याचा फायदा काय होणार, तर महिलेने सांगितल्यानुसार, टिकली लावली की, काही महिलांना त्या जागेवर पुरळ येतात किंवा मग खूप खाज येते. टिकलीच्या गोंदमध्ये वापरण्यात येणाऱ्या हानिकारक केमिकल्समुळे या त्वचेच्या समस्या निर्माण होतात. मात्र, हा त्रास कमी करण्यासाठी हा उपाय करून बघा, असं गृहिणीचे म्हणणे आहे.
येथे पाहा व्हिडिओ
Avika Rawat Foods या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करुन कळवा.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)