Kitchen Hacks : दहीचा वापर स्वयंपाक करताना नियमित केला जातो. अनेकदा आहारतरज्ज्ञ आहारात दहीचा समावेश करण्याचा सल्ला देतात. दही खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. अनेकजण बाहेरुन दही विकत आणतात तर काही लोक घरी दही बनवतात. घरी दही बनवणाऱ्या लोकांची नेहमी तक्रार असते की घरी बनवलेले दही घट्ट होत नाही पण आज आम्ही एक अशी ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तु्म्ही दही घट्ट बनवू शकता. फक्त एक वस्तू वापरुन तुम्ही दही घरच्या घरी घट्ट बनवू शकाल. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही फक्त दोन तासांमध्ये तुम्ही दही घट्ट बनवाल.
युट्यूबवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही खास ट्रिक सांगितली आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊ या.

व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे –

  • सुरुवातीला एका भांड्यात फुल क्रिम दुध घ्या.
  • त्यानंतर हे दुध गरम करून घ्या. त्यानंतर दुध कोमट होऊ द्या. पूर्णपण थंड होऊ देऊ नका.
  • या कोमट दुधात तुरटीचा खडा फिरवून घ्या. त्यानंतर तुरटी बाहेर काढा
  • त्यानंतर त्यात एक दोन चमचे दही घ्यायचं आणि दोन तिन मिनिटे मिक्स करा.
  • एका दुसऱ्या भांड्यात हे दुध घ्यायचं.
  • थोडा गरम केलेल्या कुकरमध्ये हे दुधाचं भांडं ठेवायचं आणि झाकण लावून हा कुकर उन्हामध्ये दोन तास ठेवायचा.
  • दोन तासानंतर हा कुकर उघडून पाहल्यानंतर तुम्हाला दुधाचं दही झालेलं दिसेल. हा अनोखा जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हेही वाचा : हिवाळ्यात बनवा गरमा गरम कुरकुरीत पालक भजी, लगेच जाणून घ्या ही सोपी रेसिपी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

MadhurasRecipe Marathi या युट्यूब अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “फक्त ही १ वस्तू वापरून, २ तासात बनवा घट्ट दही” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. एका युजरने लिहिलेय, “वाह! खूप गरजेची माहिती देणारा व्हिडीओ होता.” तर एका युजरने लिहिलेय, “अडचणीच्या वेळी कामी पडेल ही ट्रिक, खूप आभार” आणखी एका युजरने लिहिलेय, “तु आणि तुझ्या रेसिपी खरंच खूप छान आहेत.”