How to get rid of Damp Fungus: पावसाळ्यातील ओलाव्यामुळे स्वयंपाकघरातील भिंती आणि कोपऱ्यांमध्ये बुरशी जमा होते,ज्यामुळे दुर्गंधी येतेच; पण बऱ्याचदा काही वस्तू खराब होतात. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही स्वयंपाकघरातील वाढत्या ओलाव्याचा त्रास होत असेल, तर काही सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही काही काळासाठी यापासून सुटका मिळवू शकता.

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर वापरा

ओलावा आणि बुरशी दूर करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा आणि व्हिनेगरदेखील वापरू शकता. खरं तर, हे दोन्ही नैसर्गिक क्लीनर मानले जातात. म्हणून या दोन्हींचे मिश्रण तयार करा. आता एका स्प्रे बाटलीमध्ये अर्धा कप व्हिनेगर आणि एक चमचा बेकिंग सोडा मिसळून मिश्रण बनवा. आता ते चांगले मिसळल्यानंतर ओल्या ठिकाणी स्प्रे करा. काही मिनिटांनंतर सर्व घासून स्वच्छ करा. त्यामुळे केवळ बुरशीच नाही, तर वासही कमी होईल.

‘हे’ उपायही आहेत फायदेशीर

  • स्वयंपाकघरातील ओल्याव्यामुळे ओलसरपणा आणि बुरशी येण्याची शक्यता कमी होते. अशा वेळी जेवण बनवताना खिडक्या सुरू ठेवा.
  • पावसाळ्याच्या दिवसांत स्वयंपाकघरातील स्लॉप, सिंक, फरशीला ओले करू नका. त्यावर पाणी असल्यास ते लगेच साफ करा.
  • स्वयंपाकघरातील भांड्यांच्या कपाटांमध्ये नॅफ्थॅलीन बॉल ठेवा. त्यामुळे बुरशी येत नाही.
  • कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटीफंगल गुण असतात. त्याला स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात ठेवू शकता.