Kitchen jugad: गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. दरम्यान एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरात स्वीच असतातच, मात्र तुम्ही कधी या लाइटच्या स्वीचवर कांदा किंवा टॉमेटो लावला आहे का? आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन…लाइटच्या स्वीचवर कांदा कोण लावतं…मात्र हा उपाय खूप फायदेशीर आहे.

आपलं घर सुंदर असावं असं प्रत्येकाला वाटतं, त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकजण आपलं घर कसं सुंदर आणि निटनेटके राहिलं यासाठी प्रयत्न करतात. यातलं महत्त्वाचं म्हणजे घरातील रंग, घरातील रंगानं घराचं रुप पालटतं. त्यामुळे घराच्या भींती हा घरासाठी सर्वात मुख्य भाग असतो. त्यामुळे घरातील भींती जर आकर्षित असल्या तर घरही आकर्षित सुंदर दिसतं. मात्र बऱ्याच वेळेस घरातील काही कोपरे, उंच जागा , काही वस्तू अस्वच्छ राहतात. त्यापैकीच एक आहे, घरातील स्विच बोर्ड. त्याची नीट स्वच्छता करणे बऱ्याच जणांसाठी कठीण असते. त्यामुळे स्विच बोर्ड अस्वच्छ आणि काळपट दिसायला लागतो. बरेच प्रयत्न केल्यानंतरही स्विचबोर्डवरील डाग, काळपटपणा जात नाही. खूप घासल्यानंतरही त्याची पुरेशी स्वच्छता होत नाही. मात्र कांद्याचा वापर करुन तुम्ही अगदी काही मिनिटांत हे स्वच्छ करु शकता..

नक्की करायचं काय ?

पहिल्यांदा पाहूया कांद्याचा स्विचबोर्डवर वापर. कांद्याचा थोडासा भाग कापून घ्या किंवा कांद्याची साल, कांद्याचा वरचा भाग घ्या आणि तो स्विचबोर्डवर चोळा. त्यानंतर कोरड्या कपड्याने स्विचबोर्ड पुसून घ्या.आता व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही स्विचबोर्ड पाहाल तर कांदा-टोमॅटो लावण्याआधी त्यावर डाग होते पण कांदा-टोमॅटो लावल्यानंतर मात्र ते डाग गायब झाले आणि तो चकचकीत झाला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बाथरूमची डाग पडलेली, बुळबुळीत फरशी ठेवा स्वच्छ! कपड्यांचा साबण अन् ‘हे’ पदार्थ ठरतील उपयुक्त…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्हीही हे पाहून अवाक् व्हाल. बऱ्याच वर्षांपासून असलेलं तुमचं टेन्शन या जुगाडामुळे नक्कीच कमी होईल. एका गृहिणीने हा जुगाड दाखवला हे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.