थंडीच्या दिवसात कोरड्या त्वचेवर अनेकजण वॅसलिनचा वापर करतात. अगदी पाच रुपयांना मिळणारी वॅसलिनची डब्बी अनेकींच्या बॅगमध्ये पाहायला मिळते. याच्या रोजच्या वापरामुळे हिवाळ्यात कोरडे पडलेले ओठ, त्वचा मुलायम ठेवता येते. पण वॅसलिनचा केवळ हा एकच उपयोग नाही. याशिवायही किचनमध्ये वॅसलिनचा असा काही उपयोग करु शकता ज्याचा यापूर्वी कोणी विचारही केला नसेल, आम्ही तुमच्यासाठी एक नवा किचन जुगाड घेऊन आलो आहे, यामध्ये तुम्हाला गॅस शेगडीला वॅसलिन लावयचे आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल याने काय होणार? पण गॅसला वॅसलिन लावण्याने अशी काय कमाल होते जे पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल, एकदा तुम्ही हा उपाय पाहिलात तर दररोज कराल.

आता गॅसवर वॅसलिन लावयचे म्हणजे नेमक काय करायचे, त्याचा काय फायदा होणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पुढे सविस्तर दिली आहेत. चला मग याचा उपयोग काय जाणून घेऊ…

चहा पिणे पूर्णपणे बंद केल्यास वजन होते कमी? डॉक्टर काय सांगतात, वाचा

तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे तर, तुम्हाला संपूर्ण गॅस शेगडीला वॅसलिन लावायचं आहे. तुम्ही टिश्यू पेपर, कापडाच्या मदतीने वॅसलिन संपूर्ण गॅसला लावू शकता. यामुळे गॅसवर वॅसलिनची एक लेअर तयार होईल, याने फायदा असा होईल की, तुम्ही गॅसवर चहा, दूध, आमटी, डाळ, मटण, चिकण बनत असाल आणि ते शिजल्यानंतर चुकून बाहेर उतू गेलं तर साफ करणे सोपे होईल, अनेकदा भाजी, आमटी किंवा चहा उतू गेल्यानंतर आपण गॅस पटकन पुसतो किंवा धुवून घेतो. पण रोज गॅस धुतल्याने खराब होऊ शकतो. तसेच पटकन हे डाग जर स्वच्छ केले नाही तर ते सहज निघतही नाहीत. अशापरिस्थितीत तुम्ही गॅस शेगडीवर वॅसलिन लावले असेल तर गॅस सहज स्वच्छ करता येईल, यामुळे शेगडी धुण्याची देखील गरज लागणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडिओ

वॅसलिनचा असा अनोखा वापर एका गृहिणीने दाखवला आहे. Prajakta Salve या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही घरी नक्की ट्राय करुन पाहू शकता, जर तुम्हा हा जुगाड ट्राय केला असेल आणि खरंच याचा तुम्हाला फायदा झाला असेल किंवा नसेल, जे काही मत आहे आम्हाला कमेंट करुन कळवा.