Kitchen Trolly Cleaning Hacks Tricks : हल्ली अनेकांच्या घरात भांड्यांसाठी स्टँडऐवजी किचन ट्रॉली दिसून येतात. या किचन ट्रॉलीमध्ये अगदी लहान मोठी भांडी सहज ठेवता येतात. यामुळे एक फायदा होतो, तो म्हणजे किचनजवळ भांड्यांच्या किंवा डब्यांचा पसारा होत नाही, त्यामुळे किचन अगदी टापटिप ठेवता येते. पण, या ट्रॉली वापरण्यासाठी जितक्या सहज असतात, तितक्याच आतून त्या लवकर खराब होतात.
या ट्रॉलीमध्ये बऱ्याचदा ओली भांडी ठेवली जातात. या ओलसरपणामुळे ट्रॉलीवर गंजल्यासारखे लालसर डाग दिसू लागतात. याशिवाय चिकटपणा आणि धुळीमुळे त्यावर खूप घाण जमा होत जाते. या ट्रॉली वेळीच स्वच्छ केल्या नाही तर त्यावरील घाण, गंज काढण्यासाठी बरीच मेहनत आणि वेळ जातो. म्हणून तुम्ही खालील काही सोप्या टिप्स वापरून किचन ट्रॉली अवघ्या काही मिनिटांत स्वच्छ करू शकता.
किचन ट्रॉली साफ करण्यासाठी वापरा ‘या’ गोष्टी (Kitchen Racks Cleaning Tips)
किचन ट्रॉली आतून अनेकदा खूप तेलकट, चिकट होतात. अशावेळी त्या साफ करण्यासाठी एका भांड्यात १ चमचे मीठ, बेकिंग सोडा, डिशवॉशिंग लिक्विड आणि लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. आता तयार पेस्ट स्क्रबरच्या साहाय्याने ट्रॉलीला लावा आणि स्वच्छ करा, यामुळे ट्रॉलीवरील चिकट घाण आणि गंजाचे डाग निघून जातील.

तुम्ही स्क्रबरऐवजी ब्रशही वापरू शकता. पण, ट्रॉली साफ करताना त्यात पाणी सांडणार नाही ना याची काळजी घ्या; अन्यथा संपूर्ण ट्रॉली गंजण्याची शक्यता आहे. अशावेळी ट्रॉली स्वच्छ करून झाल्यानंतर कॉटनच्या कोरड्या कपड्याने व्यवस्थित पुसा.
अशाप्रकारे चांदीसारखी चमकेल स्टीलची किचन ट्रॉली (Deep Clean Kitchen Trolly)
ट्रॉलीची घाण साफ केल्यानंतर त्याची चमक वाढवण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता. यासाठी ट्रॉली पूर्णपणे सुकल्यानंतर कापसाच्या बॉलमध्ये खोबरेल तेलाचे काही थेंब घाला आणि संपूर्ण ट्रॉलीवर लावा, त्यामुळे ट्रॉली लवकर गंजणार नाही आणि ट्रॉलीची चमकही वाढेल.
खोबरेल तेलाऐवजी तुम्ही मोहरीचे तेलही वापरू शकता. तसेच ते वापरताना प्रमाणाची विशेष काळजी घ्यावी. तेल लावल्यानंतर ट्रॉलीत सामान ठेवण्यापूर्वी सुमारे १ तास ओपन ठेवा.
‘या’ गोष्टींची घ्या काळजी (Kitchen Trolley Cleaning Tricks)
१) ट्रॉलीमध्ये कधीही ओली भांडी ठेवू नका.
२) ट्रॉली ओल्या कापडाने पुसल्यानंतर सुकण्यासाठी ओपन करून ठेवा. ट्रॉलीतील कप्पे बाहेर निघणारे असतील तर तुम्ही एक-एक कप्पा बाहेर काढून स्वच्छ करा.

३) दमट वातावरणात दररोज ट्रॉली कोरड्या कापड्याने स्वच्छ करा.
किचन ट्रॉली किती दिवसांनी साफ करावी? ( Kitchen Trolly Cleaning Hacks)
किचनमध्ये बसवलेली भांड्याची ट्रॉली महिन्यातून किमान एकदा साफ करायला हवी, यामुळे तुम्ही ट्रॉलीची चमक कायम ठेवू शकता. मात्र, पावसाळ्यात त्याची वारंवार साफसफाई करावी लागते, कारण पावसातील दमट वातावरणात ओल्यामुळे त्यात बुरशी वाढू शकते.