गुंतवणूकदारांमध्ये पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड (पीपीएफ) एक लोकप्रिय गुंतवणूक आहे कारण यात कर-लाभ, व्याजाचा आकर्षक दर, निश्चित परतावा आणि गुंतवणुकीची सुरक्षा असते. पण पीपीएफ खात्याचा कालावधी १५ वर्षांचा असतो, त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या इतर पर्यायांपेक्षा हा कालावधी थोड़ा अधिक वाटतो. एवढ्या मोठ्या कालावधीत तुम्हाला तुमचे खाते सध्याच्या बँकेतून इतर बँकेत नेण्याची गरज चांगली सेवा नाही मिळणे, शाखेत जाण्याची अडचण किंवा तुम्ही शहर सोडून जाणार या कारणांमुळे भासू शकते. तुम्ही पीपीएफ खाते बँकांमध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये उघडू शकता. यापैकी कुठेही खाते असल्यास तुम्ही तुमचे खाते एका बँकेतून दुसऱ्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसातून बँकेत इतर पोस्ट ऑफिसात नेऊ शकता. आता पाहूया असे करायचे झाल्यास त्याची नेमकी प्रक्रिया काय…

खाते ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया

diy barley water summer benefits hydration uti why you must include a glass of barley water to summer routine
उन्हाळ्यात रोज प्या एक ग्लास बार्लीचे पाणी; मिळतील डॉक्टरांनी सांगितलेले ‘हे’ जबरदस्त फायदे
IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
Investment Opportunities in the Capital Goods Sector Top Companies
गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू
do you drink sugarcane juice in summer
Sugarcane : उन्हाळ्यात उसाचा रस पिताय? जाणून घ्या, उसाचे सेवन करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी?

१. एकाच बँकेच्या किंवा पोस्ट ऑफिसाच्या एका शाखेतून इतर शाखेत खाते नेण्यासाठी तुम्हाला तुमच्या सध्याच्या शाखेत जाऊन ट्रान्सफरसाठी अर्ज द्यावा लागेल. हे खाते ट्रांसफर होण्यासाठी १ ते ७ दिवस लागू शकतात.

२. जर तुम्हाला तुमचे खाते एका बँक / पोस्ट ऑफिसातून इतर बँक / पोस्ट ऑफिसात ट्रान्सफर करायचे असेल, तर तुम्हाला अर्ज करताना नवीन बँक / पोस्ट ऑफिसाचा संपूर्ण पत्ता द्यावा लागेल. यासाठी बँक / पोस्ट ऑफिसात जाताना सोबत आपले अपडेट केलेले पासबुक आणि त्याची फोटोकॉपी न्यायला विसरू नका.

३. ट्रान्सफरचा अर्ज मिळाल्यावर तुमची बँक / पोस्ट ऑफिस तुमच्या नवीन शाखेत काही महत्वाचे कागदपत्र पाठवतील. यात तुमच्या खात्याची एक सर्टिफाइड प्रत, खाते उघडताना भरलेला मूळ फॉर्म, नॉमिनेशनचा फॉर्म आणि अखेरच्या शिलकीसाठी (असेल तर) चेक किंवा डीडी असे सर्व असते.

४. नवीन बँक / पोस्ट ऑफिसमध्ये सर्व कागदपत्रे आल्यावर तुम्हाला एक नवीन पीपीएफ अर्ज फॉर्म (फॉर्म ए), नॉमिनेशन फॉर्म आणि मूळ पासबुक नवीन कार्यालयात द्यावे लागतील. तुम्हाला पुन्हा केवायसीच्या प्रक्रियेतून जावे लागू शकते आणि ही ट्रान्सफर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी एक महिना लागू शकतो.

या गोष्टी लक्षात ठेवा

तुम्ही पीपीएफ खाते ट्रान्सफर करता, तेव्हा तुमचे नवीन खाते हे जुन्या खात्याचेच चालू स्वरूप मानले जाते त्यामुळे खाते संपण्याची तारीख आणि त्यातून पैसा काढण्याचे नियम बदलत नाहीत. तरीही खाते ट्रान्सफर केल्यावर तुम्हाला नवीन पासबुक दिले जाईल ज्यात तुमच्या शिल्लक असलेल्या रकमेचा उल्लेख केलेला असेल. जर तुम्ही बँकेतून पोस्ट ऑफिसात खाते ट्रान्सफर करू इच्छिता, तर लक्षात ठेवा की बँकेप्रमाणे पोस्ट ऑफिसात तुम्हाला तुमचे खाते ऑनलाइन बघता येणार नाही किंवा ऑनलाइन व्यवहार करता येणार नाहीत. तेव्हा पैसे भरण्यासाठी, काढण्यासाठी किंवा शिल्लक रक्कम बघण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसात जावे लागेल.

आदिल शेट्टी

सीईओ, बँकबझार