या नवीन वर्षामध्ये आता नव नवीन कार्यक्रम, लग्नसराई, सण या सर्वाची रेलचेल असेलच. पण या सर्व कार्यक्रमांमध्ये फक्त जरदोशी, पैठणी, आणि जरीच्या साड्या नेसून तुम्ही कंटाळला आहात का ? असाल तर हे काही साड्याचे प्रकार फक्त तुमच्यासाठी. ह्या साड्या तुमचा संपूर्ण चेहरा मोहराच बदलून टाकतील. भारताची ही समृद्ध वस्त्रपरंपरा अभिमानास्पद अशीच आहे. याच वस्त्रपरंपरेतील एक प्रकार म्हणजे हातमाग. माग या यंत्रावर हाताने विणलेल्या कापडाला हातमागावरील कापड असे म्हटले जाते. नंतर त्यांवर नैसर्गिक रंगानी कलाकुसर केली जाते. जगभरात भारतीय हातमागाला प्रचंड मागणी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. खादी सिल्क : रेशमी किड्याच्या कोषांपासुन एक प्रकारचा अत्यंत मऊ, तलम व बारीक धागा तयार केला जातो. त्यानंतर या धाग्याची वस्त्रे हातमागावर विणली जातात. ती एवढी तलम असतात की, एक संपूर्ण साडी अंगठी मधून निघू शकते. सिल्क म्हणजेच रेशम याला भारतामध्ये खूप महत्व आहे. भारताच्या पूर्व आणि उत्तरेला त्याला रेशीम असे संबोधतात तर दक्षिणेमध्ये त्यास पत्तू असे म्हणतात. जगामध्ये सिल्क च्या उत्पादनामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो तर पहिल्या क्रमांकावर चीन आहे. भारतामध्ये ९७ % सिल्क हे आंध्रप्रदेश, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यातून येते. रेशमी किड्याच्या कोषांपासुन तयार झालेले धागे हातमागावर विणले जातात आणि त्यापासून साडी तयार करण्यात येते. या साडीचे अजून एक वैशिष्य म्हणजे ह्या साडीमध्ये वापरले जाणारे सर्व रंग निसर्गामधून तयार केलेले असतात. त्यामुळे ही साडी नेसल्यानंतर आपल्याला स्वर्गीय आनंद मिळतो हे नक्की.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know more about haathmag saari
First published on: 10-02-2018 at 11:10 IST