History of Cadbury : चॉकलेट खायला आवडत नाही असे म्हणणारे फार क्वचित लोक असतील, जिभेवर चॉकलेटचा एक तुकडा ठेवल्यानंतर त्याच्या गोडव्याने आपण दुसऱ्याच दुनियेत हरवून गेल्याला अनुभव येतो. यामुळे अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्व व्यक्तींना चॉकलेट खाणं खूप आवडतं. विशेषत: लहान मुलांचा राग शांत करत त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम हे चॉकलेट करते. पण आपण जेव्हा चॉकलेटबद्दल बोलतो तेव्हा अनेकांच्या पहिले डोळ्यासमोर येते ते म्हणजे कॅडबरी चॉकलेट. आज चॉकलेटसंबंधीत अनेक ब्रँड बाजारात आले पण कॅडबरीची चव अनेकांना खूप आपलीशी वाटली, आवडली.

आज कॅडबरीचे डेअरी मिल्क, फाइव्ह स्टार, जेम्स अशी अनेक उत्पादने लोकांनी आपलीशी वाटतात, लोक ती तितक्याच आवडीने खातात. आपल्या आवडत्या व्यक्तीलाही कॅडबरी प्रेमाने दिली जाते. व्हॅलेंटाईन दिनानिमित्त कॅडबरीची मागणीही प्रचंड वाढते. अगदी पाच रुपयांच्या मिळणाऱ्या डेअरी मिल्कपासून ते शंभर ते पाचशे रुपयांपर्यंतची कॅडबरी अगदी आवडीने आणि प्रेमाने दिली जाते. पण कॅडबरीच्या चवीप्रमाणेच या कंपनीचा इतिहासही तितकाच रंजक आहे. त्यामुळे आपल्या चवीने लोकांना आकर्षित करणात यशस्वी झालेल्या कॅडबरीचा संपूर्ण प्रवास जाणून घेऊ…

BJP Navi Mumbai, Navi Mumbai Eknath Shinde,
नवी मुंबईत शिंदे समर्थकांच्या अभियानामुळे भाजपमध्ये अस्वस्थता
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
What are cities doing with land reclaimed from garbage dumps under Swachh Bharat Mission
Swachh Bharat Mission: स्वच्छ भारत मिशन मोहिमेच्या अंतर्गत कचऱ्याच्या ढिगाऱ्यांपासून मुक्त झालेल्या जमिनीचा वापर कसा केला जातोय?
Black Friday movie controversy (1)
“मला वाटलं भारत सरकार प्रिंट जाळेल”, घाबरलेल्या अनुराग कश्यपने परदेशात नेलेल्या ‘या’ बंदी घातलेल्या सिनेमाच्या DVD
mula mutha riverfront development project gets environment clearance
डोळ्यांचे पारणे फिटणार?
nagpur ambazari lake overflowed flood situation completes one year
नागपूरच्या महापुराची वर्षपूर्ती! भय इथले संपत नाही…
man stabbed due to drunken argument one arrested for attempted murder
दारु पिताना झालेल्या वादातून मेहुण्याला भोसकले, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकास अटक
shivshardul percussion indian band in usa
अमेरिकेतील शिवशार्दूल पर्कशन्सच्या ढोल-ताशा गर्जनेची दशकपूर्ती

जॉन कॅडबरी यांचा जन्म

कॅडबरीचे जनक जॉन कॅडबरी यांच्या जन्म १२ ऑगस्ट १८०१ बर्मिंगहॅममध्ये जन्म झाला. रिचर्ड टेसर कॅडबरी आणि एलिझाबेथ हेड असे त्यांच्या आई- वडिलांचे नाव. जॉन कॅडबरी यांचे कुटुंब इंग्लडच्या पश्चिमेकडील भागातील एका श्रीमंत कुटुंब होते. पण जॉन कॅडबरी ज्या धर्मातील होते, त्या धर्माकडे समाजात वेगळ्या नजरेने पाहिले जात होते. या धर्माच्या लोकांना ना शाळेत शिकण्याची परवानगी होती, ना नोकरीची. अशा परिस्थितीत स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

यावेळी जॉन कॅडबरी यांनी धार्मिक शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर कॉफी शॉपमध्ये काम करण्यास सुरुवात केली. यानंतर १८२४ मध्ये जॉन यांनी बर्मिंगहमच्या बुल स्ट्रीट येथे स्वत:चे किराणा मालाचे दुकान उघडले. यावेळी लोक चहा किंवा कॉफीपेक्षा चॉकलेट ड्रिंक्स फार आवडीने पित असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. यानंतर जॉन यांनी स्वत: विविध प्रकारचे चॉकलेट ड्रिंक तयार करुन विकू लागले. यादरम्यान त्यांनी ११ प्रकारचे कोको आणि १६ प्रकारचे हॉट चॉकलेट ड्रिंक्स विकण्यास सुरु केला, अशाप्रकारे किराणामालापेक्षा त्यांनी चॉकलेट ड्रिंक्स विक्रीवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आणि व्यवसाय वाढवला. पण लोकांना त्यांचे खास कॅडबरी चॉकलेट ड्रिंक इतके आवडले की ते काही काळातच आसपासच्या भागात खूप प्रसिद्ध झाले.

१८४७ मध्ये जॉन यांनी त्यांचा भाऊ बेंजामिनलाही आपल्या व्यवसायात सामील करुन घेतले. यानंतर कंपनी “कॅडबरी ब्रदर्स” म्हणून ओळखली जाऊ लागली. यांनातर दोघांनी मिळून ब्रिज स्ट्रीट येथे एक कारखाना सुरु केला. १८५४ मध्ये राणी व्हिक्टोरियाने त्यांच्या कंपनीला रॉयल वॉरंटचे प्रमाणपत्र दिले, पूर्वी फक्त श्रीमंत वर्गच चॉकलेट विकत घेत असे. उत्पादनांचा दर्जा उत्तम होता त्यामुळे खर्च जास्त होत असल्याने कंपनीचे उत्पादनही खूप महाग होते, म्हणून कॅडबरीची उत्पादने पूर्वी मुख्यतः श्रीमंतांना विकली गेली. अगदी राजे- महाराजे ती विकत घ्यायचे. कॅडबरी उत्कृष्ट उत्पादनांमुळे संपूर्ण ब्रिटनमध्ये प्रसिद्ध झाली, परंतु १८६० च्या सुमारास व्यवसायातील वादांमुळे भाऊ बेंजामिनने जॉन कॅडबरीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जॉन यांनी १८६१ मध्ये कंपनीची जबाबदारी त्यांची दोन मुले रिचर्ड आणि जॉर्ज यांच्याकडे सोपवली.

रश्मी वारंग यांनी ब्रँडनामा सदरात कॅडबरीयविषयी लिहिलं होतं >>

कॅडबरी इतर चॉकलेट उत्पादनापेक्षा वेगळे का आहे?

त्यानंतर दोन्ही भावांनी मेहनतीच्या जोरावर ‘कॅडबरी’ कंपनीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. बॉर्नव्हिले फॅक्टरी आणि कॅडबरी हे नाव सर्वदूर पसरत होते. यावेळी चॉकलेट ड्रिंक्ससह कंपनी अनेक इतर उत्पादने तयार करत होती. कंपनी चांगल्याप्रकारे नावारुपास येत होती, यावेळी जॉर्ज कॅडबरी यांनी १९०५ मध्ये कॅडबरीच्या प्रसिद्ध डेअरी मिल्क चॉकलेटचा शोध लावला.त्या काळी स्विस चॉकलेट, फ्रेंच चॉकलेट लोक चवीने खात होती, पण त्यात कोकोचा अधिक वापर केला जात असल्याने ती चवीला कडवट होती. पण जॉर्ज कॅडबरी यांनी चॉकलेटमधील कडवटपणा कमी करण्यासाठी त्यात दुधाचा वापर करत डेअरी मिल्क या नव्या चॉकलेटचा प्रयोग बाजारात आणला. जो लोकांनाही प्रचंड आवडला. त्यांनी तयार केलेल्या चॉकलेटमध्ये इतर चॉकलेटच्या तुलनेत दुधाचे प्रमाण फार जास्त होते.

डेअरी मिल्क हे नाव कसे पडले?

कंपनी यशस्वी होत तर होती पण आपल्या उत्पादनाचे नाव काय ठेवावे? याचा विचार जॉर्ज करत होते. त्यांच्या डोक्यात हायलँड मिल्क, जर्सी अँड डेरी मिल्क अशी काही नावं आली, यावेळी कॅडबरचे नियमित ग्राहक असणाऱ्या व्यक्तीच्या मुलीने डेअरी मिल्क असे एक नाव सुचवले. हे नाव जॉर्ज यांनाही खूप भावले, ज्यानंतर कंपनीच्या उत्पादनाचे नाव पडले कॅडबरीज डेअरी मिल्क. चॉकलेट आणि मिल्कचे कॉम्बिनेशन दर्शवणारे या डेअरी मिल्क उत्पादनांना ग्राहकांची प्रचंड पसंती मिळाली. यामुळे डेअरी मिल्क हा इंग्लंडमधील नंबर एकचा उत्पादक ब्रॅण्ड ठरला. १९२८ साली डेअरी मिल्कने एक lass and a half या सुप्रसिद्ध स्लोगनखाली आपली उत्पादन विक्री सुरु केली. डेअरी मिल्कमधील दुधाचे अधिक प्रमाण दर्शवणारी ती जाहिरात आजही तितकीच प्रसिद्ध आहे.

विशेष म्हणजे glass and a half या स्लोगनने आणि कॅडबरीच्या रॅपरवरच्या चॉकलेटमध्ये ओतल्या जाणाऱ्या दुधाच्या ग्लासांच्या लोगोतून हे चॉकलेट आपल्यासाठी आरोग्यासाठी निश्चितपणे फायदेशीर असल्याचे पटवून देण्यात कंपनी यशस्वी ठरली असे म्हणायला हरकत नाही.

कॅडबरी कंपनीचा पहिला लोगो जॉर्जेस ऑरिओल यांनी डिझाइन केला होता, ज्यांनी पॅरिस मेट्रोचे साइनेज तयार केले होते. कॅटबरी नावाचा लोगो म्हणजे रिचर्ड कॅडबरीचा मुलगा विल्म कॅडबरी यांची सही आहे आजही इतकीच ओळखी वाटते. तर लोगोतील पहिल्या सी अक्षरात कोको झाडाची बी स्टायलिस्ट पद्धतीने दाखवली आहे. दरम्यान कॅडबरीच्या जांभळ्या रंगाच्या रॅपरमागेही एक रंजक कथा आहे. कॅडबरीचे जांभळा, मखमली रॅपर आणि त्यातली सोनेरी कागद, हे जगप्रसिद्ध कॅडबरीचे सिग्नेचर आहे. त्याचे जांभळा रॅपर १९१४ साली कॅडबरी कंपनीने राणी व्हिक्टोरिया हिच्या सन्मानार्थ आणले आणि तोच आजही कायम ठेवले आहे. त्यामुळे आता वेगळ्या रंगाच्या रॅपरच्या कॅडबरीची आपण कल्पनाही करू शकत नाही. त्याला १८५५ मध्ये रॉयल वॉरंट देखील मिळाले आणि आजही ते कायम आहे.

एकेकाळी कॅडबरीला जांभळ्या रंगावर पूर्ण हक्क होता. इतर कोणत्याही चॉकलेट कंपनीला तो रंग वापरता आला नाही. पण नेस्लेने याविरोधात न्यायालयात धाव घेत अपील केले आणि जिंकले, त्यामुळे आता कोणीही हा रंग वापरू शकतो. १९०५ ते २०१२ कॅडबरीच्या चॉकलेटबारच्या आकारात कोणताही बदल करण्यात आला नाही, मात्र बारचं वजन कमी करण्याच्या हेतूने २०१२ मध्ये त्याला आकार मधोमध गोलाकार करण्यात आला.

कॅडबरीच्या पॅकेजिंगचा रंग नेहमी जांभळाच का असतो? जाणून घ्या त्यामागचा रंजक इतिहास

cadbury वेबसाईडवर दिलेल्या माहितीनुसार, जागतिक महायुद्धातही कॅडबरी कंपनीने मोलाचे सहकार्य केले, कंपनीने सैन्याला अनेक आवश्यक वस्तू पुरवल्या. या वस्तूंमध्ये कॅडबरीचा समावेश त्यांनी केला. यामुळे महायुद्धामुळे कॅडबरीची गुडविल वाढली, तसेच सैनिक आणि लोकही चॉकलेट आहाराच्या रुपात खाऊ लागते.

कॅडबरी ब्रँड भारतात कसा प्रसिद्ध झाला?

the strategy story वेबसाईडच्या माहितीनुसार, कॅडबरीने १९४८ साली पहिल्यांदाच भारतात आपले उत्पादन लाँच केले, पण त्यावेळी भारतात चॉकलेट तितकेसे प्रसिद्ध नव्हते. केवळ श्रीमंत लोकांमध्येच चॉकलेटविषयीची क्रेझ होती. पण १९९४ मध्ये ‘असली स्वाद जिंदगी का’ या स्लोगनसह केलेल्या जाहिरातीने भारतात कॅडबरीची लोकप्रियता खूप वाढली. या जाहिरातील एक मुलगी कॅडबरी खाण्याचा आनंद घेत क्रिकेटच्या मैदानात आनंदाने नाचत असल्याचे दाखवण्यात आले होते. यामुळे चॉकलेट हा भारतीय संस्कृतीचा भाग नसला तरी सर्व वयोगटातील लोक त्याचा आनंद घेऊ शकतात हा समज झाला. यानंतर कॅडबरीची ‘Eaters need an excuse to eat’ ही मोहीमही खूप चालली.

डेअरी मिल्कने गेल्या काही वर्षांमध्ये आकर्षक जिंगल्स आणि अनोख्या, आकर्षक जाहिरातींनी ग्राहकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली. चॉकलेटचा संबंध ‘मीठा’ (गोड मिठाई) या शब्दाशी जोडत त्यांनी भारतातील पारंपारिक मिठाईच्या प्रकारास टक्कर देण्यासाठी एक रणनीती अवलंबली.

२००० च्या दशकात डेअरी मिल्कमध्ये कीड मिळाल्याची बातमी प्रसिद्ध झाली. त्यामुळे कॅडबरी डेअरी मिल्क कंपनी वादात सापडली. परिणामी विक्री ३० टक्क्यांनी कमी झाली . पण अनोख्या आणि सर्जनशील धोरणांमुळे लोकांमध्ये पुन्हा फार कमी वेळात कंपनीबद्दलची विश्वासार्हता वाढली.

२००० च्या दशकात बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे ‘कुछ मीठा हो जाए’ या जिंगल अंतर्गत डेअरी मिल्कचा प्रचार करणारे कॅडबरीचे पहिले सेलिब्रिटी ॲम्बेसेडर बनले, यानंतर त्यांनी सणानिमित्त पारंपारिक मिठाईला पर्याय म्हणून कॅडबरी चॉकलेट सेलिब्रेशन देऊ शकते हे जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांना पटवून दिले. या काळात खानेवालों को खाने का बहाना चाहिए, ‘पप्पू पास हो गया’, ‘कुछ मीठा हो जाए’, ‘क्या स्वाद है जिंदगी में’ या जिंगल्सअंतर्गत चालवलेल्या कॅम्पेनला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

यामुळे भारतीय लोकांच्या भावना आणि संस्कृतीशी जुळवून घेत हा ब्रँड घराघरात प्रसिद्ध झाला. यादरम्यान प्रत्येक चांगल्या प्रसंगी, रात्रीच्या जेवणानंतर आणि प्रत्येक सणानिमित्त काही गोड म्हणून कॅडबरी सेलिब्रेशन पॅक लाँच केले. यातील भाऊ-बहिणीच्या नात्याचा उत्सव साजरा करणारा सण रक्षाबंधनिमित्त प्रदर्शित केलेली त्यांची जाहिरात सर्वात प्रसिद्ध झाली. इस राखी कुछ अच्छा हो जाये, कुछ मीठा हो जाये, असे या जाहिरातीचे स्लोगन होते. कॅडबरीविषयीची एक विशेष गोष्ट म्हणजे भारतात लाँच झालेल्या प्रत्येक उत्पादन आणि स्लोगनमध्ये एक नाविन्यता दिसून आली, दरम्यान कॅडबरीचे अनेक कॅम्पियन मूळतः कॅडबरी डेअरी मिल्कसाठी तयार केले गेले होते, परंतु पर्क, हॉल्स, इक्लेअर्स, सेलिब्रेशन आणि बाइट्स सारखे ब्रँड देखील त्यांच्या सावलीत भरभराटीला आले.

अलीकडेच कॅडबरी डेअरी मिल्क सिल्कने ‘हाऊ फ़ार यू गो फॉर लव्ह’ या स्लोगनवर एक नवीन जाहिरात प्रसिद्ध केली. आजच्या तरुणाईला भावेल अशा पद्धतीने ही जाहिरात तयार करण्यात आली होती.

कॅडबरी डेअरी मिल्क प्रसिद्ध होण्याचे आणखी एक कारण म्हणजे कमी प्रतिस्पर्धी आणि कमी किमती. यात गॅलेक्सी एक महत्त्वाचा प्रतिस्पर्धक ब्रँड होता, पण त्याचे चॉकलेट आधी २५ रुपयांना विकले जात होते. पण डेअरी मिल्कने अवघ्या १० रुपये किंमतीत चॉकलेट विक्री सुरु केली.

कॅडबरीने भारतात १९९८ मध्ये सुवर्ण महोत्सव साजरा केला. यामुळे कंपनीला भारतात आत ६० वर्षांहून अधिक वर्षे झाली. अध्यक्ष वाय.सी.पाल आणि एम.डी. आनंद कृपालू यांच्या नेतृत्वाखाली कंपनीकडे दोन हजार कर्मचाऱ्यांची समर्पित टीम, ५ कारखाने आणि ५ विक्री शाखा आहेत. १४ लाखांहून अधिक आउटलेट आहेत. कंपनीला इंडियाज बेस्ट मॅनेज्ड आणि इंडियाज टॉप 25 ग्रेट प्लेस टू वर्कचा सन्मानही मिळाला आहे.

आज कॅडबरी डेअरी मिल्क हा जगभरात आवडीने खाल्ला जाणारा ब्रॅण्ड आहे. अमेरिकेच्या मॉन्डलेज कंपनीने ( पूर्वीची क्राफ्ट फूड्स) कॅडबरी कंपनी २०१० मध्ये विकत घेतली. मात्र कॅडबरीची जगप्रसिद्धी पाहता नाव न बदलता त्यांनी पूर्वीचेच नाव कायम ठेवले.

speakin वेबसाईडच्या माहितीनुसार, आज कॅडबरी ही जगातील २०० वर्षे जुन्या कंपन्यांपैकी एक आहे ज्यांची प्रतिष्ठा तिच्या उत्पादनांमध्ये आणि ब्रँडमध्ये आहे. आज कॅडबरीच्या पोर्टफोलिओमध्ये दोन डझनहून अधिक उत्पादने आहेत जी जगभरात ओळखली जातात. कॅडबरी चॉकलेट्स, डेअरी मिल्क आणि त्याचे प्रकार, स्किव्हॅप्स ड्रिंक्स, ट्रायडेंट, डॉ पेपर, बोर्नविटा, हॉल्स, ट्रेबर, बॅसेट, 7 अप, कॅनडा ड्राय, मॉट्स, सेलिब्रेशन, पर्क, पिकनिक यांसारखे ब्रँड यापैकी प्रमुख आहेत.

कॅडबरीचा व्यवसाय जगातील २०० हून अधिक देशांमध्ये विस्तारलेला आहे. यामुळे कॅडबरीच्या माध्यमातून सुमारे ५५००० लोकांना प्रत्यक्ष आणि लाखो लोकांना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळला आहे. भारतीय चॉकलेट मार्केटमध्ये एकट्या कॅडबरीचा ७० टक्के वाटा आहे, नेस्ले ही त्याची प्रमुख स्पर्धक आहे. भारतात त्याचे सरासरी वितरण नेटवर्क ५.५ लाख आउटलेटपेक्षा जास्त आहे.

कॅडबरीने बर्मिंगहॅम येथील कारखान्याजवळ एक अनोखे सेंटर तयार केले असून त्याला ‘कॅडबरी वर्ल्ड’ असे नाव देण्यात आले आहे. येथे पर्यटक आणि चॉकलेट प्रेमींना कॅडबरीच्या आतापर्यंतच्या प्रवासाची अगदी चपखलपणे ओळख करून दिली जाते.

अशाप्रकारे कॅडबरीने कधी रोमान्सशी संबंध जोडत तर कधी भारतीयांच्या मानसिकतेचा आधार घेत हा ब्रँडला भारतीयांच्या ह्रदयपर्यंत पोहचवले. आणि हेच त्या ब्रँडचे यश आहे.