तुम्हाला दिवस अखेर खूप थकवा येतो?हवामान बदलले की लगेच तुम्हाला सर्दी, खोकला, ताप येतो? पोटभर खाऊन तुम्हाला वजन कमी करायचेय?तुमचा चेहरा मेकअप केल्याशिवाय चमकत नाही?सकाळी उठल्यावर पोट साफ होत नाही? या त्रासांना तुम्ही वैतागलेले असाल, तर त्यावर एकच उपाय आहे. दोन्ही वेळेच्या जेवणात किमान अर्धी वाटी पालेभाजी खा. पालेभाजी हा एक असा अन्नघटक आहे, की तो आजच्या बहुसंख्य तरुण-तरुणींना आहारात आवडत नाही.पण लक्षात घ्या की आजारी पडून औषधे घेणे आणि अशक्तपणा घालवण्यासाठी इंजेक्शन्स, टॉनिक्स घ्यायला लागण्यापेक्षा आपल्या भोजनाच्या ताटातला एक कोपरा पालेभाजीला द्या आणि फरक पहा. भाजी खरेदीसाठी जेव्हा तुम्ही मंडईत किंवा भाजी मार्केटमध्ये जाता तेव्हा असंख्य प्रकारच्या पालेभाज्या ‘आम्हाला न्या आणि आरोग्य सुधारा’ असा संदेश देत तुम्हाला खुणावत असतात. त्यांच्या गुणधर्मांना जाणून घेणे महत्वाचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालक- लोह आणि कॅल्शियम असल्यामुळे रक्तवाढीला आणि हाडे बळकट व्हायला उपयुक्त असते. ज्यांचे पोट वारंवार बिघडते त्यांना तर ही गुणकारी ठरते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leafy vegetables are useful for good health
First published on: 25-12-2017 at 11:50 IST