Diwali leftover sweets desserts: दिवाळीचा सण संपला, तरी तुमच्या घरातील गोड पदार्थांचा गोडवा काही संपला नसेल. सणासुदीच्या काळात मिठाईचा वापर थोडा जास्तच केला जातो. कोणाला तरी मिठाई गिफ्ट म्हणून मिळते, ऑफिसमधून दिली जाते किंवा लक्ष्मीपूजन, भाऊबीज या प्रसंगी मिठाई आवर्जून आणली जातेच. मात्र, या मिठाईचे काही नियोजनच केले जात नाही. ती उरता कामा नये यासाठी काहीच करता येत नाही. काजू कतली, मोतीचूर लाडू, बेसन लाडू, बर्फी अशी विविध प्रकारच्या मिठाईचा घरात साठा होतो. मात्र ही मिठाई बऱ्याच दिवसांनंतर खाणं हे आरोग्यासाठीदेखील योग्य नाही. मग त्याचं करायचं तरी काय? याच प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. दिवाळीच्या दिवसात घरात उरलेल्या मिठाईपासून काही चविष्ट पदार्थ तयार करण्याबाबत तुम्हाला सांगणार आहे. थोडक्यात काय तर त्यांचं मेकओव्हर…
काजू कतली चीझकेक
चीझ केक हा अनेकांचा आवडीचा. त्यात काजू कतली सुद्धा प्रचंड आवडीची. काजू कतलीच्या स्मूथ टेक्स्चरमध्ये क्रिमी चीझचे मिश्रण जादूसारखे काम करते आणि एक भन्नाट पदार्थ तयार होतो तो म्हणजे काजू कतली चीझकेक.
मोतीचूर लाडू ट्रफल्स
मोतीचूर लाडू हा दिवाळसणातला सामान्य गोडाचा पदार्थ आहे. या लाडूंचे रूपांतर ट्रफल्समध्ये करून त्यांचा मस्त मेकओव्हर करता येऊ शकतो. बाहेरून चॉकलेटचे आवरण देऊन आतमध्ये नाजूक मोतीचूर लाडू असा हा आगळावेगळा पदार्थ तायर होतो.
बेसन बर्फी ब्राउनी
बेसन बर्फी ब्राउनी हा एक गेम चेंजर पदार्थ ठरेल आणि तुमच्या घरातही हिट ठरेल. एकदम रिच पण थोडा फिकट अशी मस्त ब्राउनी तयार होईल.
नारळी बर्फी मॅकरॉन
नारळाची बर्फी ही मुळातच खूप आवडीची. दोन नाजूक मॅकरॉनच्या मधोमध नारळाच्या बर्फीचं मिश्रण या चवीची कल्पना करून पहा. च्युई बर्फी आणि कुरकुरीत मॅकरॉन कवच ही एक मस्त डीश आहे.
गुलाब जामुन आईस्क्रीम
गुलाब जामुन आधीच चवीला भन्नाट असतो, त्यात आईस्क्रीमसोबत ते एकत्र केल्यावर त्याची चव आणखी छान होते. हल्ली गुलाब जामुन केकही काही केक शॉपमध्ये मिळतो. मात्र तुम्ही हे कॉम्बिनेशनसुद्धा ट्राय करायला हवं. व्हॅनिला आईस्क्रीमसोबत एकत्र केल्यास एक वेगळीच चव जीभेवर रेंगाळते.
जिलेबी वॉफल्स
जिलेबीच्या टॉपसह वॉफल्सचा नाश्ता एक मस्त कॉम्बिनेशन आहे. कुरकुरीत टेक्स्चर आणि गोड चव, त्यावर व्हीप्ड क्रीम किंवा एक स्कूप आईस्क्रीम घाला.
बर्फी क्रम्बल केक
व्हॅनिला केकवर कोणत्याही प्रकारच्या बर्फीचा चुरा करून टाकल्यास एक मस्त डेजर्ट तयार होईल. थोडीशी वेलची पावडर यावर भुरभुरल्यास चव आणखी वाढेल.
बेसन बर्फी कुकीज
बेसन बर्फीमुळे छान नटी टेस्ट असलेल्या कुकीज तयार करता येतील. यामध्ये इतर काही पीठाचं मिश्रण मिसळल्यावर छान फ्लेवर यामत अॅड होईल.
