पोशाख ही अशी गोष्ट आहे जी आपले संपूर्ण व्यक्तिमत्त्व बाहेरून सादर करण्याचे काम करते. प्रत्येक भागात त्यांच्या संस्कृतीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान करतात. आजकाल भारतीय कपड्यांविषयी, विशेषत: साड्यांबद्दल जगभरात क्रेझ असून या वस्त्राने जागतिक स्तरावर उपस्थिती लावली आहे. सेलिब्रिटीच नाही, तर सामान्य महिला आणि तरुणीही साड्यांचे प्रयोग करत आहेत. साडी प्रत्येकाला नेसायला आवडते. साड्यांमध्ये व्यक्तिमत्व खुलून दिसत. मात्र, साड्यांचे जेवढे प्रकार आहेत, तेवढेच प्रकार संपूर्ण भारतभरात नेसण्याचे जवळपास अनेक प्रकार आहेत. अशा परिस्थितीत साडी आणखी सुंदर वस्त्र म्हणून उदयास येते. शिफॉन हे साडीचे साहित्य आहे जे विशेषत: पावसाळी आणि उबदार हवामानात जास्तीत जास्त नेसता येते आणि खूप सुंदर देखील दिसते. जर तुम्हाला देखील शिफॉन साडी नेसायला आवडत असेल तर तुम्ही त्याची काळजी कशी घेऊ शकता जाणून घ्या.

‘या’ महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

  • शिफॉन हे अतिशय नाजूक साहित्य आहे. हे बहुधा रेशीम, नायलॉन किंवा रेयॉनपासून बनविलेले असते. त्यामुळे ही साडी घरात धुताना नेहमी जास्त काळजी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे साडी धुताना खोलगट टबमध्ये लोकरीसाठी किंवा मऊ फॅब्रिकसाठी वापरण्यात येणारा वॉशिंग द्रव पदार्थ घालावा, आणि त्यात संपूर्ण साडी बुडवून ठेवावी. आता हलक्या हाताने साडी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ५-६ वेळा फिरवावी, त्यानंतर ती उलट दिशेने तशीच फिरवावी. त्यांनंतर साडी साधारण १५-२० मिनिटं साबणाच्या पाण्यात ठेवावी. त्यांनंतर साडी बाहेर काढून त्यातून साबणाचे बुडबुडे पूर्णपणे काढून टाकेपर्यंत स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी. त्यानंतर जर जास्तीचे पाणी असेल तर ते काढून टाकण्यासाठी मोठ्या टॉवेलच्या मध्ये ठेवावी, त्यांनंतर पानी सगळं निथळून गेल्यावर साडी हँगरमध्ये वाळवावी.
  • वॉशिंग मशीनमध्ये साडी धूत असाल तर त्यासोबत आणखी कपडे धुवू नका. साडी धुताना एकटी धुवा. शिफॉन नेहमी थंड पाण्यात धुवा. धुतल्यानंतर साबण आणि पाणी काढून टाकण्यासाठी पुन्हा मोठ्या टॉवेलच्या मध्ये ठेवून पाणी काढून घ्या. नंतर साडी कोरडी करून, हँगरमध्ये वाळवा.

(हे ही वाचा: Monsoon Tips : पावसाळ्यात असा करा मेकअप; नाही राहणार पसरण्याचा धोका)

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
summer vacation at home
उन्हाळ्याच्या सुट्टीतलं घर
loksatta Health Special article, relationship between, skin disorders, diabetes
Health Special: त्वचाविकार आणि मधुमेह नेमका काय संबंध?
Breakfast Recipe
Breakfast Recipe : नाश्त्यात झटपट बनवा मऊसूत जाळीदार आंबोळी, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

भारी बॉर्डर असेल तर काळजीपूर्वक वापरा

  • लाइट कलर असो किंवा डार्क कलर साडी, नेहमी सावलीत सुकवा. शिफॉनचं वैशिष्ट्य म्हणजे ती पावसातही सुकून जाते.
  • जर साडीला भारी काम किंवा हेवी लेस असेल तर ड्रायक्लिनचा पर्याय उत्तम ठरेल.
  • साडीला प्रेस करण्यापूर्वी नेहमी बेडवर ठेवून साडीवर हळुवार हात फिरवा. यानंतर साडीवर पातळ टॉवेल किंवा सुती कापड टाकून सिल्क किंवा फ्रेग्रेलचे ऑप्शन दाबा. नेहमी हलक्या हातांनी दाबा आणि प्रेसला एकाच ठिकाणी दीर्घकाळ ठेवणे टाळा.
  • शिफॉन कपाटात किंवा एकाच स्थितीत कुठेही बराच वेळ लटकवू नये. जर आपल्याला ते थोड्या काळासाठी ठेवायचे असेल तर, नेहमी कुशन धारक वापरा आणि मध्यभागी कपड्याची घडी फिरवत रहा.

(हे ही वाचा: पावसाळ्यात बदला तुमची जीवनशैली, जाणून घ्या ‘या’ उपयुक्त टिप्स)

टोकदार ॲक्सेसरीजपासून संरक्षण करा

  • शिफॉन हा शरीराला साजेसा असा एक कपडा आहे. त्यामुळे ते घालताना घट्ट लपेटून घेऊ नका.
  • साडीचा पदर किंवा प्लेट बनवण्यासाठी सेफ्टीपिन्सचा वापर टाळा. अनेक वेळा तर एखादा धागाही ओढल्याने संपूर्ण साडी खराब होण्याची भीती असते.
  • गैरसोय टाळण्यासाठी शिफॉन मटेरिअलमध्ये रेडी-टू-वेअर साडी तुम्ही घेऊ शकता किंवा तयार करू शकता. यामुळे पदर किंवा प्लेट्स पिनला जोडण्याचा त्रास होणार नाही.
  • शिफॉनच्या साड्यांसोबत साधारणत: कमीत कमी ज्वेलरी घालायची असते कारण त्याचा लूक खूप डेलिकेट असतो. यासाठी चांदी किंवा मोती किंवा फ्युजन ज्वेलरी लाइट मेटलमध्ये घालता येते. ते साडीला पूरक आहेत.
  • शिफॉनसोबत नेहमी टोकदार अॅक्सेसरीज किंवा दागिने घालणे टाळा. अनेकदा शिफॉनच्या साड्या खराब होण्यामागे हे एक कारण असतं.