Anant Ambani’s Bundi jacket: मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. त्यांच्या सुपुत्राचा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. हा विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरला. १२ जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड ड्राइव्हमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. तीन दिवस चाललेल्या या शाही सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. संगीत सोहळ्यापासून रिसेप्शनपर्यंतच्या या सोहळ्याचं सेलिब्रेशन मोठ्या थाटामाटात पार पडलं. या शाही लग्नाचा राजेशाही थाट पाहण्यासाठी सर्वच उत्सुक होते. १२ जुलै रोजी सुरू झालेल्या या विवाहसोहळ्याचा समारोप १५ जुलै रोजी कर्मचाऱ्यांच्या स्वागत समारंभानं झाला.

आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या रिलायन्सच्या मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या धाकट्या चिरंजीवांचा हा विवाहसोहळा केवळ देशातच नाही तर जगभरामध्ये चर्चेत होता. सोशल मीडियावरही सर्वत्र याच लग्नाची चर्चा होती. या लग्नाचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अंबानी कुटुंबाचा हा शानदार विवाहसोहळा सुरुवातीपासूनच जगभरात चर्चेचा विषय बनला होता. मुकेश अंबानी यांनी आपल्या मुलाच्या शाही लग्नात प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला आहे. त्यांचे दागिने, कपडे, शानदार सजावट, पाहुण्यांसाठी खास गिफ्टस, सेलिब्रशनमध्ये काहीच कमी नव्हती. या विवाहाशी संबंधित सर्व गोष्टींची चर्चा सुरू आहे.

राधिका मर्चंट यांच्या घरी गृहशांती पूजा आयोजित करण्यात आली होती, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राधिका मर्चंटच्या घरी आयोजित ‘गृहशांती’ पूजेला उपस्थित राहण्यासाठी अनंत अंबानी यांनी मनीष मल्होत्राच्या कलेक्शनमधून त्यांच्या आउटफिटसह एक रीगल जॅकेट निवडले होते, ज्याच्याशी संबंधित खास गोष्टी व्हायरल होत आहेत.

(हे ही वाचा : मुकेश अंबानी यांचा डाएट प्लॅन नीता अंबानींनी केला शेअर; पार्टी, मेजवान्यांमध्येही कठोरपणे पाळतात ‘हा’ नियम )

गृहशांती पूजा समारंभासाठी अनंत अंबानी यांनी मनीष मल्होत्राचा ड्रेस निवडला आणि त्याची खास गोष्ट म्हणजे तो हाताने बनवला गेला. हाताने रंगवलेल्या बुंदीच्या जॅकेटमध्ये अनंत अप्रतिम दिसत होता. अनंत अंबानींनी परिधान केलेले बुंदीचे जॅकेट वारसा आणि कलाकुसरीच्या मिश्रणाचे प्रतीक असलेले बनवले होते आणि विशेष म्हणजे त्यात सोन्याचे कामही होते.

अनंतचे हे खास जॅकेट २४ कॅरेट सोन्याने सजवलेले आहे आणि ते राजस्थानमधील नाथद्वारा मंदिराच्या शतकानुशतके जुन्या पिचवाई पेंटिंगपासून प्रेरित आहे. अनंतचे हे जॅकेट कमळ, झाड, गाय आणि मोर यांसारख्या आकृतिबंधांसह भगवान कृष्णाच्या जीवनातील विषयांचे चित्रण करते.

भिलवाडा कारागिरांनी ६०० तासांहून अधिक तास आणि पिचवाईच्या तीन तज्ज्ञ कलाकारांनी ११० तासांत १०० अस्सल २४-कॅरेट सोन्याची पाने वापरून हे जॅकेट तयार केले. प्रख्यात डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या संग्रहातून घेतलेले अनंतचे जॅकेट, जुन्या कला प्रकारांना समर्पित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डिझायनरच्या म्हणण्यानुसार, क्लासिक लाल रंगाच्या हाताने रंगवलेले बुंदीचे जॅकेट सोन्याने सजवलेले होते (चांदीची बारीक फॉइल शीट, जी मिठाई आणि खाद्यपदार्थ सजवण्यासाठीदेखील वापरली जाते) अनंत अंबानींच्या या जॅकेटची सर्वत्र चर्चा होत आहे. १०० सोन्यांच्या पानांचा वापर करून या जॅकेटवर ११० तासात काम करण्यात आले असल्याची माहिती आहे.