तिळ गूळ घ्या गोड गोड बोला! असे म्हणत तिळाचे लाडू देऊन मकरसंक्रांत आपल्याकडे साजरी केली जाते. यादिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणूनच याला मकर संक्रांत असेही म्हणातात पण मकर संक्रांत विषयी अशाही काही गोष्टी असतील ज्या अनेकांना ठाऊक नाहीत.

१. मकरसंक्रांत असा हिंदू सण आहे जो दरवर्षी १४ जानेवारीला येतो. अपवाद वगळता २०१५ मध्ये संक्रांत १५ जानेवारीला आली होती. यादिवशी दिवस आणि रात्र समान असतात.

२. आपल्याकडे हा सण मकरसंक्रांत म्हणून ओळखला जात असला तरी भारताच्या विविध भागात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. दक्षिण भारतात पोंगल, उत्तरेकडे लोहरी म्हणून तर गुजरातमध्ये उत्तरायण, माघी, खिचडी या नावाने देखील तो ओळखला जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३. मकर संक्रांत फक्त भारतातच नाही तर नेपाळ आणि थायलँडमध्येही साजरी केली जाते. नेपाळमध्ये ‘माघी संक्रांत’ तर थायलँडमध्ये सोंक्रन या नावाने हा सण ओळखला जातो.

४. १ हजार वर्षांपूर्वी संक्रांत ही ३१ डिसेंबरला साजरी केली जायची.

५. एका कथेनुसार भिष्मांनी देखील मकरसंक्रांतीच्या दिवशी आपले प्राण त्यागले होते. काही दंतकथेनुसार या दिवशी ज्या व्यक्तींचे निधन होते त्यांच्या आत्म्याला शांती मिळते.