दिवाळीसाठी आपण फुलांची रांगोळी काढतो, घराला तोरण बांधतो. नारळाची कारंजी, बर्फी असे पदार्थदेखील बनवतो. पण, या गोष्टी करताना दुसऱ्या दिवशी तीच वाळलेली फुलं आणि घरी नारळ सोलल्यानंतर त्याची शेंडी किंवा भुसा आपण कचऱ्यात टाकून देतो. असं न करता जर या गोष्टींपासून घराची हवा शुद्ध ठेवता आली तर? घर सुगंधी आणि प्रसन्न ठेवण्यासाठी या वस्तूंचा वापर करून तुम्ही घरच्याघरी स्वस्तात मस्त धूप बनवू शकता. इन्स्टाग्रामवरील @kitchen_maan या सोशल मीडिया हँडलने टाकाऊ पदार्थांपासून घरी सोप्या पद्धतीने धूप कसा बनवायचा हे दाखवणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

घरगुती धूप कसे बनवावे?

साहित्य

सुकलेली झेंडूची फुलं
सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या
नारळाचा भुसा
कापूर
लवंग
दालचिनी
तमालपत्र
चंदन पावडर
तूप
गुलाबपाणी

हेही वाचा : चहाप्रेमींसाठी आलाय हा भन्नाट ‘चाय केक’! वाढदिवसासाठी अजमावा ही खास रेसिपी; प्रमाणदेखील पाहा…

कृती :

सुकलेली झेंडूची फुलं आणि गुलाबाच्या पाकळ्या, नारळाचा भुसा, लवंग, कपूर, दालचिनी, तमालपत्र अश्या सगळ्या कोरड्या गोष्टी मिक्सरच्या भांड्यात घाला आणि सगळ्याची बारीक पावडर करून घ्या. ही पावडर चाळून घेऊन त्यात अर्धवट राहिलेल्या गोष्टी बाजूला करा. आता या बारीक केलेल्या पावडरमध्ये चंदन पावडर, २ चमचे तूप आणि थोडं गुलाब पाणी टाकून सर्व पदार्थ एकत्र मिसळून घ्या. आता या मिश्रणाला शंकूचा [कोन] आकार देऊन रात्रभर कोरडे होण्यासाठी ठेऊन द्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे मिश्रण वाळल्यानंतर धूप म्हणून वापरण्यासाठी तयार आहे. सकाळी किंवा संध्याकाळी हा धूप लावून घरभर त्याचा सुगंध दरवळून घर प्रसन्न राहण्यास मदत होईल.