आजकाल चुकीच्या खाण्यामुळे त्वचा खराब होऊ लागते. मात्र, त्वचा स्वच्छ, तजेलदार ठेवण्यासाठी महिला अनेक प्रयत्न करतात. प्रत्येकाला चमकदार आणि निरोगी त्वचा आवडते. अशा वेळी बाहेरचे केमिकलयुक्त उत्पादने वापरण्याऐवजी घरीच नैसर्गिक फेसपॅक हा उत्तम पर्याय आहे.आपण आजींकडून या घरगुती उपचारांबद्दल अनेकदा ऐकले असेल. उडीद डाळीचा फेसपॅक तुम्हाला नक्कीच आवडेल. उडीद डाळ तुमच्या त्वचेवर उत्तम चमक आणण्यासाठी उपयुक्त ठरते. तर उडदाच्या डाळीचे घरगुती फेसपॅक कसे बनवायचे ते जाणून घेऊया.

एक्सफोलिएट

हे तुमच्या त्वचेवरील धूळ-माती काढून टाकते आणि त्वचेला स्वच्छ करते. यामुळे तुमच्या त्वचेवरील मृत त्वचा (डेड स्कीन) निघण्यास मदत होते. याचा वापर करण्यासाठी, अर्धी वाटी उडीद डाळ रात्रभर पाण्यात ठेवा आणि नंतर सकाळी त्याची पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये २ चमचे तूप आणि दूध घाला. हे मिश्रण कमीतकमी ३० मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि कोमट पाण्याने धुवा.

टॅनिंग

आपल्याला टॅनिंगची समस्या असेल तरीही आपण हा फेसपॅक वापरू शकता. यासाठी रात्रभर एक पाव कप उडीद डाळ पाण्यात ठेवा आणि नंतर सकाळी त्याची पेस्ट बनवा. त्यात दही मिक्स करून पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट तुमच्या चेहऱ्या आणि टॅनिंग झालेल्या भागात लावा. सुमारे २० मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुरुमांसाठी

या उडीद डाळीमध्ये एक नैसर्गिक एन्टीसेप्टिक आहे. हे चेहऱ्यावरील येणारे पुरळ काढून टाकते. तसेच जर तुमची तेलकट त्वचा असेल तरही तुम्ही हा फेसपॅक वापरू शकता. यासाठी अर्धी वाटी उडीद डाळ रात्रभर पाण्यात ठेवा आणि नंतर सकाळी त्याची पेस्ट बनवा. त्यात दोन चमचे गुलाब पाणी आणि ग्लिसरीन घाला. शेवटी २ चमचे बदाम तेल घालून लावा. १५ मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवा.