उन्हाळ्यात किंवा दमट हवामानात मेकअप टिकवून ठेवणे हे एक आव्हान असू शकते. उबदार, दमट हवेमुळे तुमच्या सौंदर्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा वातावरणात फाउंडेशनमुळे तुमच्या चेहऱ्यावर डाग पडू शकतात किंवा अनैसर्गिक लाली येऊ शकते किंवा लिपस्टिक ‘फ्लेक्स’ किंवा ‘केकी’ दिसू शकते म्हणजे ती ओठांवर जाड थराप्रमाणे राहते. ओठांवर सुरकुत्या दिसूू शकतात. एकंदरीत लिपस्टिक ओठांवर नीटपणे न पसरता, ती ओठांवर असमान थराप्रमाणे दिसू शकते. त्यामुळे महिला अशा हवामानात अनेकदा मेकअप टाळण्याचा विचार करतात.

पण खरं तर, योग्य त्या उत्पादनाची निवड आणि काही सोप्या युक्त्यांचा अवलंब करून, तुम्ही दमट हवामानातही हलका, ताजेतवाने ठेवणारा व दीर्घकाळ टिकणारा मेकअप मिळवू शकता. मर्क कॉस्मेटिक्सच्या ब्रँड मॅनेजर मुस्कान जैन यांनी दमट हवामानात तुमचा मेकअप सर्वोत्तम दिसावा यासाठी दमट हवामानात तुमचा मेकअप सर्वोत्तम दिसावा यासाठी तुमच्याकडे ‘असायलाच हवीत’ अशा ८ सौंदर्यप्रसाधनांची यादी दिली आहे.ही सौंदर्यप्रसाधने तुम्हाला हलका, त्वचेसाठी सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारा मेकअप तयार करण्यास मदत करतील.

१. दीर्घकाळ टिकणारा प्रायमर
मेकअपची सुरुवात प्रायमरने होते आणि दमट हवामानात ही पायरी अत्यंत महत्त्वाची असते. मुस्कान जैन यांच्या मते, “चांगला प्रायमर त्वचेला समतोल करतो आणि घाम व तेलामुळे मेकअपला डाग पडण्यापासून वाचवतो. हलके आणि चेहऱ्याची त्वचा श्वास घेऊ शकेल म्हणजेच त्वचेला प्राणवायू मिळू शकेल असे प्रायमर निवडा, जे त्वचेची छिद्रे बंद न करता त्वचेचा ताजेपणा टिकवून ठेवेल.

२. हलकी कॉम्पॅक्ट पावडर
जड फाउंडेशनऐवजी मऊ, बारीक पावडर वापरणे चांगले. ती जास्तीचे तेल शोषून घेते आणि त्वचेला मॅट बनवते; परंतु ‘चॉकी’ दिसत नाही. मुस्कान म्हणते, “कॉम्पॅक्ट पावडर दिवसभर टच-अपसाठी परिपूर्ण आहे, विशेषतः टी-झोनसाठी.”

३. हायड्रेटिंग लिप टिंट किंवा मिस्ट
उन्हाळ्यात किंवा बदलत्या हवामानात लिपस्टिक कोरडी होऊ शकते. लिप टिंट किंवा मिस्ट ओठांना हायड्रेट करते आणि एक सूक्ष्म रंग देते.” ही अशी उत्पादने आहेत, जी दोन गोष्टी करतात – ओठांना हायड्रेट करतात आणि त्यांना हलका रंग देतात.

४. फेदरलाईट मॅट लिपस्टिक
उबदार, मऊ लिपस्टिकमुळे गरम हवामानात अस्वस्थ वाटू शकते. हलक्या, क्रिमी मॅट लिपस्टिकचा वापर करा, ज्यामुळे तुमचे ओठ कोरडे न होता रंग वाढेल.

५. चेहरा आणि ओठासाठी टिंट
एकाच टिंटने तुम्ही चेहरा आणि ओठ दोन्ही रंगवू शकता. ते त्वचेत सहज मिसळते आणि दमट हवामानातही टिकते. त्यामुळे नैसर्गिक आणि हलका ‘नो-मेकअप’सदृश लूक मिळतो.

६. वॉटरप्रूफ ३-इन-१ आय स्टिक
डोळ्यांच्या मेकअपने डाग पडू नयेत म्हणून, वॉटरप्रूफ आय स्टिक वापरा, जी आयलाइनर, मस्कारा आणि आयशॅडो म्हणून काम करते.

७. सेटिंग पावडर किंवा स्प्रे
मेकअप पूर्ण केल्यानंतर सेटिंग पावडर किंवा स्प्रे आवश्यक आहे. “ते बेसमध्ये लॉक होते, चमक नियंत्रित करते आणि तुमचा मेकअप निस्तेज दिसण्यापासून वाचवते.

८. मेकअप स्पंज किंवा ब्लेंडर
चांगल्या उत्पादनासाठी योग्य साधन वापरणे महत्त्वाचे आहे. स्पंज किंवा ब्लेंडर हलके, एकसमान व दीर्घकाळ टिकणारा फिनिश देतो, जो त्याला ‘केकी’ होण्यापासून रोखतो.

या टिप्स वापरून तुम्ही दमट हवामानातही हलक्या, ताजेतवाने व स्टायलिश मेकअपसह तुमच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकता.